शिंदे शिवसेनेच्या विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय नेते पदी संजय राठोड शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी दाखविला विश्वास

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून कार्य करणारे शिवसेनेचे नेते तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेना पक्षाने विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या हिरक महोत्सव मेळाव्यात शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात “संजय राठोड हे बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत” असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. “वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी देशभर फिरण्याची आपण त्यांना मोकळीक दिली आहे. त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे. त्यांच्यावर आपण लवकरच मोठी जबाबदारी सोपवणार आहोत”, असा सूतोवाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.

त्याचाच परिणाम म्हणून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेनेते मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने २३ जून २०२६ रोजी जारी केलेल्या नियुक्तीपत्रानुसार, संजय राठोड यांची ‘विमुक्त व घुमंतू जनजाती राष्ट्रीय नेता’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दुहेरी जबाबदारी

या नियुक्तीसह ना. संजय राठोड यांच्याकडे दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. एक, पश्चिम विदर्भात शिवसेना संघटन विस्तार करणे. दुसरी, राज्य व देशभरातील भटक्या व विमुक्त समाजात पक्षाचा संघटनात्मक ढाचा मजबूत करून विस्तार व सुदृढीकरण करणे.

समाजाच्या सशक्तीकरणावर भर

नियुक्तीपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, भटक्या व विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय सशक्तीकरणासाठी विशेष प्रयत्न करणे, तसेच या समाजाला मुख्य प्रवाहात जोडून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर कार्य करणे, ही संजय राठोड यांची महत्त्वाची जबाबदारी असेल.

पत्रात म्हटले आहे की, “संजय राठोड यांच्या सामाजिक कार्यातील योगदान व संघटनात्मक क्षमता लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्व, अनुभव व कार्यकुशलतेच्या बळावर राज्य व देशभर विमुक्त व भटक्या समाजात शिवसेना पक्ष अधिक मजबूत होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन, सर्वांना सोबत घेऊन पक्षाच्या विकासासाठी समर्पित भावनेने काम करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त केली आहे.

“आमचे नेते, पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना युवानेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र होण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन”, अशी प्रतिक्रिया मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

About Editor

Check Also

काँग्रेस पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीरः यादी पहा संघटन सृजन अभियानांतंर्गत स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून नियुक्त्या

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात पक्ष संघटना बांधणीवर भर देत संघटन सृजन अभियान हाती घेतले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *