राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातील राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती “आपली बस, आपली सेवा” १ मे पासून एसटीचे नवे अभियान एसटी बसेसची संख्या वाढतेय, तरी प्रवासीसंख्या आणि महसूल अपेक्षेप्रमाणे वाढत नाही
महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला सज्ज होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने “आपली बस आपली सेवा” या व्यापक अभियानाच्या माध्यमातून प्रवासी सेवेला एक नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप …
Read More »एकनाथ शिंदे यांची माहिती, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार, ‘मिसिंग लिंक’: १ मेला उद्घाटन घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक; वेगवान आणि सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची खोचक टीका, डोनाल्ड ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत परखड शब्दांत निशाणा साधत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदी सरकारने देशाच्या सार्थक धोरणाचे समर्पण केल्याचा गंभीर आरोप केला. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी “थूकून चाटणे म्हणजे काय, हे मोदींच्या भूमिकेत दिसले; डोनाल्ड …
Read More »एकनाथ शिंदे यांच्या भावना, “नदी म्हणजे नारीशक्ती… गोदा ते नर्मदा जलयात्रेतून नवीन विकास मॉडेल!” “ इतिहास, अध्यात्म, विकास आणि नारीशक्तीचा हा महासंगम!”
नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती ऊर्जा, शक्ती, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे आणि म्हणूनच नदी म्हणजे नारीशक्ती! या विचाराला जलसंवर्धन, संस्कृती आणि विकासाची जोड देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ च्या शुभारंभातून एक नवीन विकास मॉडेल मांडल. श्रीक्षेत्र चौंडी हे मराठी संस्कृतीचे …
Read More »महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे सकाळच्या सत्रात उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम
उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल, महाराष्ट्रात एमएसआरटीसीचे विलिनीकरण कधी करणार? तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय, मविआ सरकार असताना एसटीच्या विलिनिकरणाच्या बाता मारणारे भाजपाधार्जिणे नेते आता गप्प का?
काँग्रेसच्या तेलंगणा सरकारने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच फारकाळ कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत सहभागी करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात दिलेले अजून एक आश्वासन तेलंगणा सरकारने पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील एस.टी. महामंडळ राज्य सरकारमध्ये …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ; जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न …
Read More »नरहरी झिरवाळ यांचे आदेश, हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’ वापराचा उल्लेख बंधनकारक महाराष्ट्रापाठोपाठ केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाकडूनही सूचना
पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रेस्टॉरंटला त्यांच्या मेन्युकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जर पदार्थात नैसर्गिक पनीर, चीजऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरले असेल, तर त्याचा उल्लेख करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळा कामांना अधिक गती देणार मुख्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी काळात या कामांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महंत …
Read More »
Marathi e-Batmya