ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, तुमची मते घेणारे पक्षच आरक्षण संपवतायत क्रिमीलेयर आणि उपवर्गीकरण हा आरक्षण संपवण्याचाच डाव

अनुसूचित जातींमध्ये क्रिमीलेयर आणि उप-वर्गीकरणाची अंमलबजावणी हा आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटवरून केला.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सामाजिक न्याय चळवळीला हा मोठा धक्का आहे. अनुसूचित जातींमध्ये क्रिमीलेयर आणि उप-वर्गीकरणाची अंमलबजावणी हा आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पाठिंब्याने प्रक्रिया सुरू केली. कर्नाटक आणि तेलंगणातील काँग्रेस सरकारने महाराष्ट्रापूर्वीच क्रिमीलेयर आणि उपवर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू केली असल्याचा आरोप केला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षण वाचवण्याऐवजी तुमची मते घेणारे पक्ष स्वतःच तुमचे घटनात्मक आरक्षण संपवत आहेत. वंचित बहुजन आघाडीनेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा निषेध केला होता. भारत बंदच्या आवाहनाला पाठिंबा दिला होता आणि निकालाविरुद्ध पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. यावर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी काय केले? असा सवालही यावेळी केला.

शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन करत म्हणाले की, या वेळी विधानसभा निवडणुकीत हुशारीने मतदान करा, नाहीतर बाबासाहेबांचे श्रम आणि बलिदान व्यर्थ ठरेल असा इशाराही यावेळी दिला.

 

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांचा आरोप, एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला ! मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यात आणीबाणी जाहीर करावी

मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *