सुप्रिया सुळे यांच्या आरोपामुळे माझा राजकिय भाव वाढला भाजप आमदार प्रसाद लाड यांचा उपरोधिक टोला

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी पक्षात असताना मला पवार साहेब नेहमी सांगायचे क आरोप झाले की तो माणूस मोठा होतो, या शरद पवार यांच्या सांगण्यानुसार आता माझ्यावर सुप्रिया सुळे यांनी आरोप केल्याने माझा राजकिय भाव वाढल्याचा दावा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला.

तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळीही मी बिझनेस मध्ये होतो. तेव्हाही हाच व्यवसाय करत होतो. शरद पवार यांचा ब्लु आयड बॉय होतो. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी माझ्याविरोधात ट्वीट करण्याआधी एकदा शहानिशा केली असती तर बरे झाले असते असे सांगत त्यांच्या ट्वीटने मला दु:ख झाल्याची भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

प्रसाद लाड यांच्या कंपनीवर मानवी तस्करीचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी  ट्वीट केले होते. त्यास उत्तर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, गृहमंत्री काय फुगड्या घालत आहेत का? केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात असतानाही सेलेब्रिटींना माफियांच्या खुल्या धमक्या

राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून माफिया खुलेआम धमक्या देत आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या घरासमोर जाण्यापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *