‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’साठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ २५ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ मंत्री अशोक वुईके यांची माहिती

आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ तसेच ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’ देण्यात येतात.
या पुरस्कारांसाठी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त व्यक्ती आणि संस्थानी प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करावेत असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले आहे.

मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार देण्याकरिता गठीत समितीची बैठक झाली. या बैठकीस आमदार डॉ. किरण लहामटे, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, सहसचिव मच्छिंद्र शेळके उपस्थित होते.

मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याचा व्यापक प्रसार करणे तसेच आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करून इतरांना प्रेरणा देणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे.

२०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले असून, प्रकल्प कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२५ असून ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत या पुरस्कारांची छाननी प्रक्रिया होणार आहे. अधिक माहितीसाठी व्यक्ती व संस्थांनी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले आहे.

About Editor

Check Also

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम • १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे • दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *