रोहिणी खडसे संतापल्या अन् म्हणाल्या, असल्या लोकांवर गुन्हे दाखल करायला हवेत टवाळखोरांनी त्या परदेशी पाहुण्याला असा महाराष्ट्र दाखवला

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झालाय असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. असल्या लोकांवर गुन्हे दाखल करायला हवेत असंही त्या म्हणाल्या

याबाबत सविस्तर माहिती पोस्ट करताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, NewZeland च्या “Lukethexplorer” या एका YouTuber ने ५ दिवसांपूर्वी सिंहगडला भेट दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि जगापर्यंत नेण्यासाठी तो आला होता. मात्र छत्रपती संभाजी नगरहून सहलीसाठी आलेल्या या टवाळखोरांनी त्या परदेशी पाहुण्याला असा महाराष्ट्र दाखवला ! समाजातील असल्या लोकांमुळेच आपल्या महाराष्ट्राची बदनामी होते, शिवबांच्या अपमान होतो अशा त्या म्हणाल्या. तरुणांना उद्देशून त्या म्हणाल्या की, तुम्ही ज्या छत्रपती संभाजी नगरमधून येता त्यांच्या नावाची तरी काळजी घ्यायला हवी होती. असल्या लोकांवर गुन्हे दाखल करायला हवेत अशी मागणीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांचे आश्वासन, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अतिरिक्त निधीसाठी पाठपुरावा सुरू वाढत्या महागाईचा विचार करून शिष्यवृत्ती वाढविण्याचा विचार

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *