संजय राऊत यांचा सवाल, मंत्र्याचा मुलगा सिद्धांत शिरसाटकडे ६७ कोटी आले कोठून? महागडी मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, अमित शाह यांनी लुटीला परवानगी दिली का

राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या कौटुंबिक वादळाला आता पूर्णविराम मिळाला. पण आता शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी दुसर्‍या एका प्रकरणाचा गौप्यस्फोट करत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या कमाईचे साधन काय असा सवाल करत, महागडी मालमत्ता खरेदीसाठी त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून, तुमचा मुलगा ६७ कोटी रूपयात मालमत्ता खरेदी करतो हेच सोशल जस्टीस आहे का, असा सवालही यावेळी केला.

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपामुळे एक वादळ निर्माण झाल्यानंतर त्या महिलेला शांत करण्यात आले. त्यावरून शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्याबबत प्रश्नचिन्ह उभे केले. त्या मुद्यावरून आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, असे कौटुंबिक विषय असतात. त्यामध्ये आमच्या सारख्या नेत्याने पडू नये. त्यासाठी महिला आयोग आहे. महिला आघाड्या आहेत. त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी कधी कुणाच्या कौटुंबिक विषयावर बोलत नाही. मात्र ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे, त्यांचे चिरंजीव जे आहेत. यावरून भयंकर प्रकरण आहे. या महाशयांनी अत्यल्प मूल्यावर आपल्या नावावर ती प्रॉपर्टी ताब्यात घेतली. जणू ही संपूर्ण प्रॉपर्टी सिद्धांत शिरसाट यांनाच मिळावी यासाठी सरकारने लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर राबवली. ६७ कोटी रुपयाला प्रॉपर्टी घेतली. आकडा लहान नाही. एका मंत्र्याच्या मुलाकडे ६७ कोटी रूपये आहेत. जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे. ६७ कोटी रुपयाला विट्स हॉटेलची प्रॉपर्टी विकत घेतली. मूळ किंमतीपेक्षा कमी पैशात ही प्रॉपर्टी त्यांना मिळावी म्हणून ही लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवली. टेंडर भरणाऱ्यांना कमी रक्कम भरायला लावल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, एका मंत्र्याचा मुलगा आगा पिछा नाही महान नाही. उद्योग क्षेत्रात नाव नाही. संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. कुठून आले पैसे. कोणत्या टेंडरींग मधून आले. कोणत्या दलालीतून आले. एकनाथ शिंदेंनी दिले पैसे की अमित शाहनी दिले, असा सवालही यावेळी करत पचास पचास खोके आये थे. उनको ज्यादा मिला क्या, मंत्र्याचा मुलगा ६७ कोटीत हॉटेल विकत घेतो. तुमची मुलंबाळं विकत घेऊ शकता का असा सवाल केला. तसेच अचानक पैसा कुठून आला. आमचा मुलगा ६७ कोटीला एक हॉटेल विकत घेऊ शकतो हा या राज्यातील सोशल जस्टीस आहे, अशी टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना संजय राभत म्हणाले की, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रॉपर्टीची किंमत अधिक आहे. ही प्रॉपर्टी ६७ कोटीला विकत घेतली. या प्रक्रियेत कसा घोटाळा झाला. याचं पत्र सरकारला दिले आहे. मी काल अंबादास दानवेंशी चर्चा केली. हे प्रकरण जनतेसमोर आणा. जनसेवेसाठी, बाळासाहेबांच्या विचारासाठी ज्यांनी पक्ष सोडला आणि आमची शिवसेना खरी असं म्हणतात. ती खरी आहे का, असा सवाल करत अमित शाह यांनी त्यांना महाराष्ट्र लुटीचा परवाना दिला आहे, असा खोचक टोलाही यावेळी केला.

About Editor

Check Also

लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय माहिती व जनसंपर्क महासंचालनालय असणार समन्वय संस्था (नोडल एजन्सी)

राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *