संजय शिरसाट यांची घोषणा, सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांचा भत्ता ५० हजारांपर्यंत वाढविण्याचे विचाराधीन विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात दिली माहिती

राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून सध्या दिला जाणारा भत्ता १५ हजार वरून ५० हजार पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली.

याबाबत लक्षवेधी सूचना सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले, सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. या संदर्भात समितीचा अहवाल प्रलंबित असून तो प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. २०२५-२६  वर्षासाठी या योजनेसाठी ७.१५ कोटींची तरतूद करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांना लाभ दिला जात आहे.

शेवटी संजय शिरसाट म्हणाले की, राज्यातील काही शाळांकडून प्रस्ताव प्रलंबित असून काही ठिकाणी भत्त्याचे वितरण पूर्ण झाले आहे. भत्ता वाढीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी संबंधित संस्थांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघांना मारहाण करून लघवी पाजण्याचा विकृत प्रकार, गुन्हेगारांना मोक्का लावा; गोरक्षणाच्या नावाखाली चाललेला नंगानाच थांबवा.

महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता, याला मागील १२-१३ वर्षात काळिमा फासला आहे. आज महाराष्ट्र पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *