९ हजार शाळांमध्ये ३ लाख विद्यार्थ्यांनी लावली उपस्थिती राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी १६४३ कोरोना पॉझिटीव्ह

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर कोरोनाची बाधा विद्यार्थ्यांना होवू नये या उद्देशाने या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १६४३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
राज्यात ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या २५ हजार ८६६ शाळा असून या शाळांमध्ये ५९ लाख २७ हजार ४५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर २ लाख ७५ हजार ४७० शिक्षक कार्यरत आहेत. ९६ हजार ६६६ शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत. राज्यातील एकूण २५ हजार ८६६ शाळांपैकी ९ हजार १२७ शाळा सुरु झालेल्या आहेत. तर शाळांमध्ये २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे निर्मित ‘पंढरपूर वारी - इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ माहितीपटाला आंतरराष्ट्रीय बहुमान

पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *