काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष आ. साजीद खान पठाण यांचा पदग्रहण सोहळा १९ तारखेला टिळक भवनमध्ये होणार पदग्रहण सोहळा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार साजीद खान पठाण यांचा पदग्रहण सोहळा  १९ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, CWC सदस्य नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी, आ. अस्लम शेख, अमिन पटेल, अनिस अहमद, अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष वजाहत मिर्झा, अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी अहमद खान, एम. एम, शेख, मनोज विश्वास, डॉ. फरिद काझी यांच्यासह प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.

About Editor

Check Also

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

ऊस गाळप हंगामाचे सन २०२६-२७ बाबत धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *