जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध मनुस्मृती जाळल्याने मरत नाही, तर कृतीने ती संपेल

राष्ट्रवादीचे( शरद पवार ) नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडले. त्यांच्या या कृतीचा वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर निषेध केला.

वंचित बहुजन आघाडीने आपल्या एक्सवर पुढे म्हणाले की, आंधळेपणाने कोणतेही आंदोलन होत नाही आणि मनुस्मृती जाळल्याने मनुस्मृती मरत नाही, तर कृती केल्याने मनुस्मृती संपेल. जर मनात मनुस्मृती आहे तर ती कृतीत उतरते आणि अशा गोष्टीं होतात अशी खोचक टीकाही केली.

जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यांच्याकडून झालेल्या या कृतीचा वंचित बहुजन आघाडीने जाहीर निषेध केला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा पुण्यातील वाहतूक व्यवस्था वेगवान करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून निर्धार व्यक्त

बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *