स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ राज्य निवडणूक आयोगाने दिली माहिती

राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येत आहे. त्या आधारे तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय; तसेच नगरपरिषद/ नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची लिंक (दुवा) राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahasec.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

जिल्हा परिषद  व पंचायत समितीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध असेल. त्याचबरोबर नगरपरिषद व नगरपंचायतीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतीच्या कार्यालयात उपलब्ध असेल. जिल्हा परिषद/ पंचायत समित्या, नगरपरिषदा/ नगरपंचायती इत्यादींच्या मतदार यादीसाठी प्रतिपृष्ठ दोन रुपयेप्रमाणे शुल्क भरावे लागेल.

प्रारूप व अंतिम मतदार यादीची विनाछायाचित्राची पीडीएफ प्रत https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

 

About Editor

Check Also

जयकुमार रावल यांची माहिती, गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला चालना

महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यास नवी दिशा देणारा आणि शाश्वत औद्योगिकीकरणाला चालना देणारा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *