जी-२० बैठकीच्या पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडीओ आणि पोस्टरवरून चर्चांना उधाण व्यक्ती केंद्रीत प्रचार आणि ब्राझीलच्या फस्ट लेडीने फोटोसेशन नकारावरून चर्चांना ऊत

जवळपास ४० वर्षानंतर भारताला अर्थात इंडियाला जी-२० चे फिरते अध्यक्ष पद मिळाले. पण या अध्यक्षपदाचा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभेच्या निवडणूका नजेसमोर ठेवून केल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगली असतानाच जपानच्या एका प्रसारमाध्यमाने त्याविषयीची एक बातमीच दिल्लीतून दिली. त्याशिवाय आज जी-२० च्या बैठकीस सुरुवात होताच ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतावेळी मोदींबरोबर फोटो काढण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ, याशिवाय दिल्लीतील अनेक गरिबांच्या झोपड्या पडद्याने झाकण्यात त्यावर मोदींचे पोस्टर जागोजागी लावण्यात आल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने बैठकीपेक्षा या गोष्टींचीच चर्चा समाज माध्यमांवर सर्वाधिक रंगल्याचे दिसून येत आहे.

त्याचबरोबर वॉशिंग्टन पोस्ट, न्युयॉर्क टाईम्स या जागतिक दर्जाच्या प्रसारमाध्यमांनीही अशाच पध्दतीच्या बातम्या त्यांच्या वर्तमान पत्रात प्रसिध्द करण्यात आले. त्यातच आज सकाळी जी-२० साली उपस्थित राहिलेल्या ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष सिल्व्हा यांच्या पत्नीने स्वागतावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यावरूनही मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडविण्यात येत आहे.

याशिवाय संसदेच्या परिसरात तसेच विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष त्यांची सोय करण्यात आलेल्या पंचतारांकित हॉटेल्सच्या रस्त्याच्या दुतर्फा फक्त मोदी यांच्या नावाचे स्वागत करणारे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत.

About Editor

Check Also

एलॉन मस्क यांचा सवाल, भारताचे खरे मालक मुकेश अंबानी आहेत का? स्टारलिंक इंटरनेट कंपनीला भारतात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत

भारतात ‘स्टारलिंक’ (Starlink) इंटरनेट सेवा सुरू करण्यातील नियामक अडथळ्यांवरून एलॉन मस्क यांनी आपली टीका अधिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *