गृहमंत्र्यांनी साजरा केला बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस किवळे फाटा येथे वाढदिवस केला साजरा

मुंबई: प्रतिनिधी
गृहमंत्री अनिल देशमुख काल पुणे येथे दौऱ्यावर होते. आज सळाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचेशी थोडा वेळ थांबून संवाद साधला.
त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याची माहिती घेतली. तसेच अडीअडचणी बाबत चर्चा केली. या चर्चे दरम्यान त्यांना समजले की बंदोबस्तासाठी असलेले पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस असूनही कुटुंबापासून दूर आपले कर्तव्य करणाऱ्या श्रीकांत जाधव यांचे गृहमंत्र्यांना कौतुक वाटले. केवळ कौतुकच नव्हे तर राज्याचा गृहमंत्री पण पोलीस विभागाचा कुटुंब प्रमुख या नात्याने गृहमंत्री, पोलीस उपनिरीक्षकाच्या आनंदात सामील झाले. त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि मुंबईकडे मार्गस्थ झाले.
दस्तुरखुद गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा होत आहे. हे पाहून जाधव व तेथील उपस्थित सर्व पोलीसअधिकारी, कर्मचाऱ्यांना आनंद झाला.

About Editor

Check Also

महिला आरक्षण आणि डिलिमीटेशन विधेयकावरून किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक चकमक कायद्यांना विनाकारण एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय

महिला आरक्षण विधेयकाला प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डीलिमिटेशन) प्रक्रियेशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या कोंडीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *