पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शनिवारी (२६ एप्रिल २०२५) रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या “तटस्थ” चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर “सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्याचा” आरोप केला. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे हे वक्तव्य आले आहे.
अबोटाबाद येथील एका लष्करी अकादमीत आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान शेहबाज शरीफ म्हणाले की, “पाकिस्तान कोणत्याही तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत भाग घेण्यास तयार आहे,” असे सांगितले.
शिवाय, शेहबाज शेरीफ यांनी सांगितले की सशस्त्र दल “देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास तयार आहोत”, असेही यावेळी सांगितले.
शेहबाज शरीफ पुढे बोलताना सांगितले की, “आमचे शूर सशस्त्र दल फेब्रुवारी २०१९ मध्ये भारताच्या बेपर्वा घुसखोरीला दिलेल्या मोजक्या पण दृढ प्रतिसादातून स्पष्टपणे दिसून आले आहे की, कोणत्याही चुकीच्या कृतीविरुद्ध देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि त्याच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आणि सज्ज आहेत,” असे सांगितले.
२२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममधील मिनी स्विझरलंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन कुरणात दहशतवाद्यांनी गोळीबार करत पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात इस्लामाबादचा सहभाग नाकारत असल्याचेही यावेळी जाहिर केले. या हल्ल्यानंतर, दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे तर पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे.
तसेच दोन्ही बाजूंनी अनेक राजनैतिक उपाययोजना लागू केल्या आहेत, तर भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याने काश्मीरमध्ये दुसऱ्या दिवशी रात्रभर गोळीबार केला, असे भारतीय लष्कराने शनिवारी (२६ एप्रिल २०२५) सांगितले.
India’s reckless attempt to blame Pakistan for the tragedy in Pahalgam is both irresponsible and dangerous.
Pakistan strongly rejects these allegations and is ready to participate in any neutral and transparent investigation. pic.twitter.com/h552htl3bk
— Prime Minister Shehbaz Sharif (Parody) (@NotCMShehbaz) April 26, 2025
भारतीय लष्कराने सांगितले की, रात्रीच्या वेळी पाकिस्तानी लष्कराच्या “अनेक” चौक्यांकडून “बिनधास्त” लहान शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला.
“भारतीय सैन्यानेही लहान शस्त्रांनी योग्य प्रत्युत्तर दिले,” असे एका निवेदनात म्हटले आहे, मात्र गोळीबारांच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
तर पाकिस्तानकडून तात्काळ पुष्टी मिळालेली नाही, परंतु दोन्ही बाजूंनी आदल्या रात्री त्यांच्या संबंधित सैन्यात गोळीबार झाल्याची पुष्टी केली आहे.
संयुक्त राष्ट्रांनी भूतकाळात अनेक युद्धे लढलेल्या शेजाऱ्यांना “जास्तीत जास्त संयम” दाखवण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या तणावाच्या पार्श्वभूमीवर असे म्हटले आहे की हा वाद “एक ना एक मार्गाने सुटेल”.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) सांगितले की, त्यांचा देश “प्रत्येक दहशतवाद्याचा आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून शिक्षा करेल”, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करेल” असे जाहिर केले.
पाकिस्तानचे शेहबाज शरीफ म्हणाले की देश हल्ल्याच्या “कोणत्याही तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत भाग घेण्यास तयार आहे”.
प्रत्युत्तर म्हणून इस्लामाबादने भारतीय राजदूत आणि लष्करी सल्लागारांना हद्दपार करण्याचे आदेश दिले, शीख यात्रेकरूंचा अपवाद वगळता – भारतीय नागरिकांचे व्हिसा रद्द केले आणि त्यांच्या बाजूने मुख्य सीमा ओलांडणे बंद केले.
पाकिस्तानने असा इशाराही दिला की सिंधू नदीतून पाणीपुरवठा रोखण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न “युद्धाचा निर्णय” असेल.
जम्मू-काश्मीर सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बर्फाळ महिने वगळता वर्षभर खुले असलेल्या या पर्यटन स्थळासाठी कधीही पोलिसांची परवानगी मागितली गेली नाही.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवसांनंतर, सुरुवातीला हल्ल्याचा दावा करणाऱ्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) ने पहलगाम घटनेत कोणताही सहभाग नाकारला. “या कृत्याचे कोणतेही श्रेय टीआरएफला देणे हे खोटे, घाईघाईने केलेले आणि काश्मिरी प्रतिकाराला बदनाम करण्याच्या सुनियोजित मोहिमेचा भाग आहे,” असे त्यांनी एक्स वर पोस्टमध्ये सांगितले आहे.
“पहलगाममधील हल्ल्यानंतर, आमच्या एका डिजिटल प्लॅटफॉर्मवरून एक संक्षिप्त आणि अनधिकृत संदेश पोस्ट करण्यात आला. अंतर्गत ऑडिटनंतर, आम्हाला असे मानण्याचे कारण आहे की हे एका समन्वित सायबर घुसखोरीचे परिणाम होते – भारतीय राज्याच्या डिजिटल युद्ध शस्त्रागारातील एक परिचित युक्ती.”
Marathi e-Batmya