विशेष बातमी

महसूल राज्यमंत्री सत्तार यांचेही निवडणूक प्रतिज्ञापत्र वादाच्या भोवऱ्यात प्रत्येक निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात वेगवेगळी माहिती

पुणे-मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात माहिती लपविल्याने प्रकरणी पुणे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी चौकशी दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सध्याचे विद्यमान महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक माहितीचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे त्यांचे नेमके शिक्षण किती असा सवाल डॉ.अभिषेक हरिदास यांनी …

Read More »

विधानमंडळ पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे पण कोरोना मुक्त आमदारांनाच प्रवेश ७ आणि ८ सप्टेंबरला घेण्याचा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुख्यमंत्री …

Read More »

…अन्यथा प्रत्येक शाळेवर गुन्हा दाखल करू शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा निर्वाणीचा इशारा

अचलपूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक शाळांकडून अधिकचे शुल्क आकारण्यात येत आहे. अधिकची फि घेण्याचे आता आढळून आले तर वाढीव फि घेणाऱ्या प्रत्येक शाळांवर गुन्हा दाखल करू असा इशारा देत शाळांनी नफेखोरी करू नये असे आवाहनही शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वाढीव फि आकरण्यात येत असल्याच्या …

Read More »

सोनियां गांधीच्या नेतृत्वावरून प्रदेश काँग्रेसमध्ये दोन गट बाळासाहेब थोरातांचे राहुल गांधींना साकडे तर गायकवाड आणि देशमुख यांचे सोनियां गांधीना

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशात भाजपाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी काँग्रेसकडून म्हणावे तितके प्रयत्न होत नाहीत. त्यातच पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर मर्यादा येत असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नुकतीच पक्षातील नेत्यांनी एका पत्राद्वारे केली. मात्र राज्यातील प्रदेश काँग्रेसमध्ये सोनिया गांधीनी कि राहुल गांधी यांनी नेतृत्व …

Read More »

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खुलासा फसवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक झाल्यानंतरही दावा दाखल करता येतो

पुणे-मुंबई: प्रतिनिधी पुणे येथील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात संचालक आणि निश्चित करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती लपविली. त्याच्या चौकशीचे आदेश पुणे जिल्हा दंडाधिकारी (जेएमएफसी) ने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त प्रसारीत होताच पाटील यांनी अशा प्रकरणात उच्च न्यायालयात …

Read More »

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची निवडणूक आयोगाला खोटी माहिती: न्यायालयाचे चौकशीचे आदेश राजकिय अडचणीत वाढ होणार

पुणे- मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे महसूल मंत्री म्हणून काम केलेले आणि भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी निवडणूकीसाठी असलेल्या शपथपत्रात खरी माहिती लपवून खोटी माहिती दिली. तसेच स्वत:च्या उत्पन्नाचे स्त्रोत लपविल्याप्रकरणी कोथरूड येथील रहिवासी डॉ.अभिषेक हरिदास यांनी यासंदर्भात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने चौकशी करून १६ …

Read More »

फडणवीस सरकारने मंजूर केलेले महसुल विभागातील कारकून बनले आता “महसूल सहाय्यक” राज्य सरकारकडून पदनाम बदलीसंदर्भात आदेश जारी

मुंबई : विशेष प्रतिनिधी सरकारमधील प्रशासनात नेहमीच महत्वाची भूमिका बजाविणारी कारकून जमात ही नेहमीच महत्वपूर्ण मानली जाते. तसेच या जमातीशिवाय दस्तुरखुद्द सरकार आणि जनतेचे पान हालत नाही. सरकारी भाषेत या कारकूनाला लिपिक हा शब्द वापरण्यात येतो. मात्र आता महसूल विभागात कार्यरत असणाऱ्या या जमातीला कारकून अर्थात लिपिक शब्द आवडेनासा झाला …

Read More »

उस्मानाबादलाही आता स्वतंत्र विद्यापीठ ? समिती स्थापनेचे आदेश उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत- उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याचा पुढाकार

मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून  सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते. …

Read More »

अनुसूचित जाती-जमातीच्या शासकिय कर्मचाऱ्यांची माहिती २ दिवसात सादर करा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभागांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना देण्यात येत असलेल्या पदोन्नती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्याची पुढील सुणावनी लवकरच होणार असल्याने सध्या शासकिय विभागात कार्यरत असलेल्या या दोन्ही प्रवर्गासाठीची मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती दोन दिवसात अर्थात २० ऑगस्ट पर्यत सामान्य प्रशासन …

Read More »

पार्थ, सध्या जे काम करतोयस तेच कर राजकारणातल्या संधीच बघू पवार कुटुंबियाकडून पार्थची समजूत

बारामती-मुंबई : विशेष प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता स्व.सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी केल्यानंतर यासंदर्भात त्यांचे आजोबा शरद पवार यांनी पार्थला जाहीररित्या फटकारले. त्यामुळे पवार कुटुंबियामध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चेला उधाण आले. त्यावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »