Tag Archives: शिवसेना उबाठा

महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून रूपाली चाकणकर यांना हटवण्याची मागणी महिला नेत्यांमुळे राज्यातले राजकारण तापले

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यांनी मोर्चा उघडला. महिला नेत्यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना आयोगाच्या पदावरून हटवण्याची मागणी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या त्यांच्या कार्य पद्धतीवरून नाराजी वाढली असून विरोधी पक्ष आणि …

Read More »

राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू, शिवसेना उबाठाला काँग्रेसचे चोख प्रत्युत्तर सोम्या गोम्याच्या धमक्यांना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष भीक घालत नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळ फासू, त्यांच्या ताफ्यवर दगडफेक करू अशी धमकी शिवसेना उबाठाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी इशारा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही. मविआ गेली खड्ड्यात, आमच्यासाठी आधी सावरकर आणि हिंदुत्व असे वादग्रस्त वक्तव्य करत राहुल गांधी यांना बाळा दराडे …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, मंत्र्याचा मुलगा सिद्धांत शिरसाटकडे ६७ कोटी आले कोठून? महागडी मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, अमित शाह यांनी लुटीला परवानगी दिली का

राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या कौटुंबिक वादळाला आता पूर्णविराम मिळाला. पण आता शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी दुसर्‍या एका प्रकरणाचा गौप्यस्फोट करत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या कमाईचे साधन काय असा सवाल करत, महागडी मालमत्ता खरेदीसाठी त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून, …

Read More »

अंबादास दानवे यांची मागणी, धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड व हॉटेल व्हिआयटीएस लिलावाची चौकशी करा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतंत्र व उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करा

धनदा कार्पोरेशन लिमिटेड व हॉटेल व्हिआयटीएस VITS, छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर लिलाव प्रक्रिया राबविल्याप्रकरणी स्वतंत्र व उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. तसेच, सदर मालमत्तेचे कोणतेही अंतिम हस्तांतरण …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, उबाठाकडून मुंबईकरांशी १ लाख कोटींची बेईमानी मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून श्वेतपत्रिकेची मागणी

गेल्या २० वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे १ लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी करत ही १ लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा थेट आरोप …

Read More »

शिवसेना उबाठा प्रणित कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या सदस्य कंपन्यांच्या शेकडो कर्मचा-यांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश कार्यक्रम भाजपा प्रदेश कार्यालयात झाला. या कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने रविंद्र चव्हाण यांची …

Read More »

शिवसेना उबाठाच्या अनेक जणांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश उबाठा गटाच्या आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

विरोधकांच्या आरोपांना आणि टीकेला आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिले, त्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे तसेच मुंबईतील उबाठा नगरसेविका सुजाता सानप यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

धुळेमध्ये सरकारी रेस्ट हाऊसमध्ये २ कोटींचे घबाड; एसआयटी चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही सत्य बाहेर आणू, अर्जुन खोतकर यांचे पीए निलंबित

धुळे जिल्ह्यातील एका सरकारी अतिथीगृहाच्या खोली क्रमांक १०२ मधून सापडलेल्या १ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम सापडली. या रकमेवरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी ही रक्कम शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर यांचेच पैसे असल्याचा आरोप केला. सदर रेस्ट हाऊसची ती खोली अर्जून खोतकर यांच्या …

Read More »

अंबादास दानवे यांची भीती, वन नेशन वन इलेक्शनमुळे केंद्रात एका पक्षाची हुकूमशाही विधयेकात हरकती नोंदवून दुरुस्ती करण्याच्या सूचना

वन नेशन वन इलेक्शनमुळे केंद्रात एका पक्षाची हुकूमशाही निर्माण होईल, अशी भीती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त करत एक राष्ट्र, एक निवडणूक संयुक्त समितीला हरकती नोंदवून त्यात दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहे. अंबादास दानवे पुढे म्हणाले की, या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी भारताच्या राज्यघटनेतील कलम ८३, ८५, १७४, ३५६, ७५ (३) व …

Read More »

सर्वपक्षिय शिष्टमंडळांवरून संजय राऊत यांची टीका, ही बारात कशासाठी पंतप्रधान कमकुवत, भाजपाला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय

पाकिस्तान – भारत दरम्यान युद्धबंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी दहशतवादाच्या प्रश्नावरून पाकिस्ताला एकटे पा़डण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पक्षिय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले. तसेच या शिष्टमंडळांना विविध देशांच्या भेटीवर पाठविण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकारने परदेशी दौऱ्यााठी निवडलेल्या शिष्टमंडळांना बारात …

Read More »