Tag Archives: अयोध्या

संसद परिसरातील नाटकात पूजारी झालेले खासदार पप्पू यादव यांच्यावर दिल्लीत हल्ला आधी चप्पल भिरकावली आणि नंतर चाकूने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

बिहारच्या पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना दिल्लीत एका पत्रकार परिषदेदरम्यान एका व्यक्तीने चप्पल फेकल्याने लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि त्यांचे समर्थक व हल्लेखोर यांच्यात झटापट झाली. मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिरासाठी असलेल्या देणग्यांच्या चोरीशी संबंधित कायद्यावर यादव यांनी केलेल्या वक्तव्याशी हा निषेध संबंधित होता. चप्पल फेकल्यानंतर यादव यांचे …

Read More »

कन्हैया कुमार यांची मागणी, देणगी चोरीची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा, ट्रस्ट बरखास्त करा प्रभूरामाचे दान चोरणे महापाप, कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेशी चाललेला खेळ काँग्रेस खपवून घेणार नाही

भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू धर्माशी काहीही देणेघेणे नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते धर्माचा वापर करत असून त्यांचा एकच राम आहे आणि तो म्हणजे नथुराम, प्रभुरामाशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही. रामभक्तांनी प्रभू रामाला भक्तीभावाने पैसे, सोने, चांदी दान केले, त्यावर भाजपा आरएसएसच्या लोकांनी दरोडा टाकला आहे. प्रभूरामाच्या नावावर कोट्यवधींची …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, प्रभू रामाच्या देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी? अयोध्येच्या राम मंदिर विश्वस्त मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच ‘खास’ लोक; रामभक्ताच्या देणग्यांचा हिशोब द्या, काँग्रेसच्या ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचा नाशिकच्या काळाराम मंदिरातून शुभारंभ, ९ तारखेपासून राज्यभर सत्याग्रह

अयोध्येमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने प्रभू रामाचे मंदिर बांधण्यात आले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या मंदिराच्या विश्वस्त मंडळाची घोषणा केली. या विश्वस्तांमध्ये भाजपा, आरएसएस व मोदींच्या खास लोकांना नियुक्त केले व या ट्रस्टला आरटीआयच्या कक्षेतून बाहेर ठेवले. जगभरातील कोट्यवधी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने प्रभू राम चरणी दान व देणगीच्या स्वरुपात अब्जावधी रुपये …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आऱोप, राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणारे मोदी व RSS चे ‘खास’ लोक राम मंदिरासाठी दिलेल्या सोने चांदीच्या विटांचा हिशोब द्या, ‘मैं भी खाऊंगा, मेरे लोगों को भी खाने दूंगा’, हे चालणार नाही

मोघलांनी देशातील मंदिरे लुटली, सोमनाथचे मंदिर मोहमद गझनीने लुटले पण सध्या मंदिर लुटणारे स्वकीयच निघाले. भाजपा व त्यांच्या बगलबच्च्यांनी चक्क मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामालाच लुटले आहे. हा सर्व प्रकार तळपायाची आग मस्तकात जाणारा आहे, पण रामाच्या व हिंदूच्या नावावर राजकारण करणारा भाजपा व रा. स्व. संघाचा एकही नेता या दरोड्यावर …

Read More »

अयोध्येतील दिवाळीच्या दिपोत्सवाची दोन गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे प्रमाणपत्रे

भगवान रामाचे शहर अयोध्या, मातीच्या दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशाने उजळले आणि पुन्हा एकदा इतिहास रचला, रविवारी छोटी दिवाळीनिमित्त २६ लाखांहून अधिक दिव्यांच्या नदीत पवित्र शहराला स्नान घालून आणि या प्रक्रियेत दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रमाणपत्रे मिळाली. हा विक्रम अयोध्येतील सरयू नदीच्या …

Read More »

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती, त्यामुळे राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा अयोध्येचा निकालावेळी मी देवासमोर बसून होतो आणि मार्ग दाखविला

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड सिंग हे आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बोलताना मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या अयोध्येतील वादग्रस्त जमिनीप्रकरणी दिलेल्या निकालावर पहिल्यांदाच भाष्य केले. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले की, अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या निकालाच्या दिवशी मी देवासमोर मार्ग दाखव म्हणून बसलो आणि मला मार्ग मिळाला. त्यानुसार …

Read More »

अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी, भाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन …

Read More »

राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणारे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहिर केल्यानंतर घरी जात केले अभिनंदन

देशातील हिंदूत्ववादी राजकारणाचा आणि अयोध्येतील बाबरी मस्जिदीच्या जागेवर राम मंदिर होता असा दावा करत राम मंदिर उभारणी आंदोलनाचा पाया रचणारे आणि नरेंद्र मोदी यांना राजकिय संधी उपलब्ध करून देणारे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज भारतरत्न जाहिर करण्यात आला. विशेष म्हणजे भारत रत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहिर केल्यानंतर …

Read More »

अयोध्येतील राम मंदिर हे भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात

अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लल्ला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असून भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण असल्यामुळे आपण सर्व राम ललाच्या दर्शनाला अयोध्येला जावूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात मुर्तीची प्रतिष्ठापना

मागील अनेक वर्षापासून भाजपाच्या जाहिरनाम्यावर असलेल्या बाबरी मस्जिदीची जागेवर राम मंदिराची उभारणी करण्याचे आश्वासन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करत तमाम हिंदूत्ववादी मतदारांच्या मनात आश्वासनपूर्तीचा विश्वास सार्थ ठरविला. सकाळपासूनच अयोध्येतील हनुमान गढी, सीताराम मंदिरासह अनेक ऋषींच्या मंदिराचे पूजन केले. त्यानंतर जवळपास १२ वाजता राम मंदिरातील रामलल्लाच्या मुर्तीचे विधिवत पूजन …

Read More »