सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड सिंग हे आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बोलताना मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या अयोध्येतील वादग्रस्त जमिनीप्रकरणी दिलेल्या निकालावर पहिल्यांदाच भाष्य केले. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले की, अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या निकालाच्या दिवशी मी देवासमोर मार्ग दाखव म्हणून बसलो आणि मला मार्ग मिळाला. त्यानुसार मी अयोध्येच्या राम मंदिर जागेचा निकाल दिल्याची कबुली यावेळी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी राम जन्मभूमी जागेबाबतचा निकाल दिला. त्यानंतर राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर श्री रामजन्मभूमी ट्रस्टने त्या जागेवर मंदिर उभारलं. तसेच या मंदिराचे उद्धाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात झालं. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठात न्यायमुर्ती रंजन गोगई, शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण, आणि एस अब्दुल नाजीर या पाच न्यायमुर्तींचा समावेश होता. यापैकी धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या आहेत.
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड पुढे बोलताना म्हणाले की, पूर्वजांच्या पुण्याईमुळे मी इथपर्यंत प्रवास केला. तर यमाई देवीच्या कृपेने भारताचा सरन्यायाधीश झालो. न्यायालयात काम करताना अनेक वेळा अशी प्रकरण समोर येतात की, ती सोडवण अवघड असतात. माझी अशीच अवस्था अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल देताना झाली. अयोध्येतील रामजन्मभूमीचा खटला माझ्यासमोर सुरु होता. तीन महिने त्यावर सुणावनी सुरु होती. शेकडो वर्षे जो वाद सोडवू शकलं नव्हतं. तेच प्रकरण आमच्यासमोर ठेपलं होतं. त्यावेळी यातून मार्ग कसा शोधायचा असा प्रश्न आमच्यासमोर होता. मीखटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाची पूजा करताना देवाकडेच मदत मागितली होती असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले की, दररोज जशी पूजा करतो तशीच पूजा मी त्या दिवशी करत होतो. मी भगवंतापुढे बसलो आणि म्हणालो आता तुम्हीच मार्ग सोधून द्या, तुमचा यावर विश्वास असेल, तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात. देवानेही मलाही मार्ग दाखवला असे स्पष्ट केले.
शेवटी सरन्यायाधीश म्हणाले, मी देशभर अनेक ठिकाणी फिरलो, तिथली मंदिर पाह्यली. पण कन्हेसरचं यमाई देवीचं मंदिर मला खुप आवडतं. इतकं सुंदर मंदिर मी देशात मी देशात पाहिलं नसल्याचेही यावेळी आवर्जून नमूद केलं.
Marathi e-Batmya