Tag Archives: किरीट सोमय्या

कुर्ला येथील उद्यानात काही मुलांकडून जोडप्याला मारहाण पोलिसांकडून आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले

मुंबईतील एका सार्वजनिक उद्यानात एका जोडप्याला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर, पोलिसांनी आठ मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळील एका बागेत घडली. हे अल्पवयीन मुले कथितरीत्या अश्लील टिप्पणी करत होती, ज्या वेळी संबंधित जोडपे फोटो काढत होते. जोडप्याने याला …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, हसन मुश्रीफांविरोधात २७०० पानांची तक्रार ईडी आणि आयकर विभागाकडे देणारे भाजपाचे किरीट सोमय्या आता गप्प का? मंत्री हसन मुश्रीफांची ‘फाईल बंद’ हीच मोदी सरकारच्या ‘वॉशिंग मशीन’ राजकारणाची खरी ओळख

मोदी सरकार तपास यत्रणांचा राजकीय वापर करते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील पीएमएलएअंतर्गत सुरू असलेली कारवाई बंद करण्याची मागणी स्वतः ईडीने न्यायालयात करून हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. विरोध पक्षातील लोकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करायचे व …

Read More »

“भारत सोडा” खटल्यात अभिनेता इम्रान खान ने उच्च न्यायालयासमोर मागितली बिनशर्त माफी एसआयआर विरोधी आंदोलनात भाग घेतल्याप्रकरणी मागितली माफी

अभिनेता इम्रान खान याने मुंबईतील ‘एसआयआर’ (SIR – Special Intensive Revision) विरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ (OCI) कार्डधारक म्हणून त्याला “देशावर टीका करण्याचा अधिकार नाही,” असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने त्याला फटकारले होते. सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, इम्रान खानवर ‘स्पेशल इंटेंसिव्ह …

Read More »

अभिनेता इम्रान खान यांना भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरुन एफआरआरओची देश सोडण्याची नोटीस अभिनेता इम्रान खान मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान ‘फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस’ (FRRO) द्वारे बजावण्यात आलेल्या नोटीसविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. या नोटीसमध्ये त्याला ‘फॉरेनर्स ॲक्ट’चे (परदेशी नागरिक कायदा) उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचिका दाखल झाल्यानंतर, ती तातडीने सुनावणीसाठी सादर केली जाईल. मुख्य …

Read More »

संजय राऊत यांना जामीन मंजूर सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर दिली जामीन

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी माझंगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला. अब्रुनुकसानी याचिकेप्रकरणी ठोठावलेल्या शिक्षेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, संजय राऊत यांनी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहून जामीनासाठी अपील …

Read More »

खिचडी घोटाळा प्रकरण : सुरज चव्हाण यांचे अटकेला आणि ईडी कोठडीला आव्हान उच्च न्यायालयाने बजावली प्रतिवाद्यांना नोटीस

कोरोनाकाळात मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांनी अटकेला तसेच सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) कोठडीला आव्हान दिले आहे. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवाध्यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना १७ जानेवारीला खिचडी घोटाळा प्रकरणी …

Read More »

केशव उपाध्ये यांची टीका, मविआच्या ‘खोटा फॅक्टरी’ला न्यायालयाची सणसणीत चपराक संजय राऊत यांच्या शिक्षेवर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया

उबाठा सेनेचा भोंगा आणि मविआचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्याने, त्यांचा तोल पुरता ढळल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकविण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयाने टाळे लावले असून त्यांना …

Read More »

न्यायालयाच्या शिक्षेवर संजय राऊत म्हणाले, न्यायपालिकेचे संघीकरण झालेय… वरच्या न्यायालयात दाद मागणार

शौचालय बांधणीत घोटाळा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सौमय्या यांच्या नावे असलेल्या एनजीओ असलेल्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी किरीट आणि मेधा सौमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … ब्लॅकमेल करण्याचे कटकारस्थान देवेंद्र फडणवीसांचेच

भारतीय जनता पक्षाने मागील १० वर्षात अत्यंत खालची पातळी गाठत खूनशी व कपटी राजकारण करुन विरोधकांना संपवण्याचे काम केले. महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सरकारी यंत्रणेला हाताशी धरून ब्लॅकमेल केले. भाजपच्या या खूनशी राजकारणावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला आणि आज अखेर सत्य समोर आले. विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम …

Read More »

पाचतासाच्या ईडी चौकशीनंतर रविंद्र वायकर यांचा किरीट सोमय्यावर हल्लाबोल चौकशीला बोलावले तर परत येईन

भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराच्या तक्रारीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा गेल्या पाच तासांपासून आमदार रविंद्र वायकर यांची चौकशी करीत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या क्रीडांगण आणि उद्यानाच्या जागेवरही अनधिकृत ताबा घेऊन ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी तक्रारीत केला होता. याप्रकरणी पाच तास चौकशी झाल्यानंतर …

Read More »