Tag Archives: प्रताप सरनाईक

उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’ चालक-वाहकाच्या तत्परतेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक!

काल रात्री मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील वाहतूक रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्याने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. रात्रीची वेळ आणि प्रवासासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने विशेषतः महिला व महाविद्यालयीन तरुणी चिंतेत होत्या. अशा परिस्थितीत कसारा येथे थांबलेली एसटी बस प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने उंबरमाळी येथे पोहोचली. एसटी चालक …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे निर्देश, एसटीच्या कंत्राटी भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखा उमेदवारांची फसवणूक झाल्यास कठोर कारवाई करा, बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या खासगी संस्थांची चौकशी करण्याचे निर्देश

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) लवकरच सुमारे १३ हजार ९८० चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी. बाह्य संस्थेमार्फत करण्यात येणारी उमेदवारांची निवड एसटी महामंडळाने निर्धारित केलेल्या पात्रता निकषांनुसारच व्हावी, याची संबंधित संस्थेने आणि एसटी प्रशासनाने …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला महिलांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ!

महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबरपासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत स्मार्ट कार्ड नसतानाही महिला लाभार्थ्यांना प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. एसटी महामंडळातील विविध …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, रॅपिडो, ओला, उबर चालकांची काटेकोर तपासणी करा; दोषींवर गुन्हे दाखल करा गरज पडल्यास चालकांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी स्वतंत्र सुधारित कायदा करणार

रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांच्या चालकांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित चालकांची काटेकोर तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मोटार परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. …

Read More »

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीच्या अतिरिक्त जमिनींच्या व्यावसायिक विकासाला वेग • पीपीपी तत्वावर विकासातून एसटीला भरीव उत्पन्नाचा नवा स्रोत • प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा अधिकाधिक व्यावसायिक वापर करून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर विकास करण्यास आणि त्यासाठी ४९+४९ वर्ष असा एकूण ९८ वर्षांपर्यंतचा भाडेपट्टा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एसटीच्या मालमत्तेतून नियमित …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, २०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’; १०० टक्के इलेक्ट्रिक ताफ्याचे लक्ष्य ५ हजार नवीन डिझेल बसेस ठरणार शेवटच्या

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचा ताफा सन २०३७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे ५ हजार डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल बसेस ठरणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष …

Read More »

रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, • गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना तातडीने उपचार, • रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि एकात्मिक रुग्णवाहिका यंत्रणेवर भर

राज्यातील रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य तसेच संबंधित यंत्रणांनी अधिक समन्वयाने काम करावे. अपघात नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवरमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा राज्य रस्ता सुरक्षा …

Read More »

कर्नाटक पॅटर्नच्या धर्तीवर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थापन केली दुष्काळी मंत्रिमंडळ समिती शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना काढणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मान्सून पाऊसाचा कालवधी संपण्याचा कालावधी अधिकृतरित्या ५ ऑक्टोंबर रोजी संपणार आहे. मात्र तत्पूर्वीच मान्सूनच्या पावसाने राज्यातील अनेक भागात उघडीप दिली. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या हातची पिके जाण्याची शक्यता निर्माण झाली. तर काही ठिकाणी पिके हातची गेल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. कर्नाटकातही अशीच परिस्थिती …

Read More »

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत महामंडळाचा सामंजस्य करार

महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म (एसटी) टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत १२५ ‘हिरकणी कक्ष’ (Lactation Pods) उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री …

Read More »