Tag Archives: बीड

जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका, स्वतः गाडीत बसून तो पोलिसांच्या दारात येतो…. राज्यव्यवस्था कुठे चाललीय, हा सगळा संशयाचा सापळा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना न सापडलेला संशयित आरोपी वाल्मिक कराड हा थेट स्वतः गाडीत बसून त्याच्यासोबत दोन चार माणसं सोबत घेऊन आला. बरं त्याने पोलिसांना दाखवून दिलं की आपण तुम्हाला मोजत नाही. तसेच सीआयडीला शरण येण्यापूर्वी त्याने जो व्हिडिओ रिलिज केला त्यात तो स्वतः सांगतो की, …

Read More »

शरणागती आधी वाल्मिक कराड जारी केलेल्या व्हिडिओत काय म्हणाला खोट्या खंडणी प्रकरणात गुन्हे दाखल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून शोध घेण्यात येत असलेल्या मारेकरी आणि मास्टरमाईंडचा शोध घेण्यात येत होता. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे नाव पुढे आले. अखेर प्रकरणी राजकिय गरमागरमी झाल्यानंतर अखेर …

Read More »

देशमुख हत्याप्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण सीआयडीसमोर शरण येण्याआधी व्हिडिओ जारी केला

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडचे माजी नगराध्यक्ष तथा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांनी आज अखेर पुणे येथील सीआयडी कार्यालयात स्वतहून शरणागती पत्करली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संतोष देशमुख यांची हत्या होवून २० झाले, …

Read More »

बीडमध्ये सर्वपक्षियांचा मोर्चा, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे, मनोज जरांगे पाटील, माजी खासदार संभाजीराजे, सुरेश धस आदी जण मोर्चात सहभागी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्यांना अटक करा आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या या प्रमुख मागणीसाठी आज मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांना अटक करा या मागणीसाठी आज सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, स्थानिक खासदार बजरंग सोनावणे, भाजपा आमदार सुरेश धस, …

Read More »

धनंजय मुंडे यांची मागणी, स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी… या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठवायचा डाव

मागील जवळपास १५ दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड याच्यावर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत हात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच याप्रकरणी धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्या कथित संबधावर दररोज नव नवी माहिती उघडकीस येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडचे …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडून परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भाजपा सरकार वस्तुस्थितीच मान्य करण्यास तयार नाही, चौकशीतून उत्तर काय मिळणार हे स्पष्ट आहे.

परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत …

Read More »

अंजली दमानिया यांनी उघड केले धनंजय मुंडे -वाल्मिकी कराड यांच्यातील संबध सात-बाराचे उतारे दाखवित जमिनीही दोघांच्या नावावरः सर्वाधिक पिस्तुलाचे परवाने बीडमध्ये

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे आले. त्यानंतर वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे हितसंबधही उजेडात आले. त्यासाठी पंकजा मुंडे यांनीच दसरा मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांचे पानही ज्याच्याशिवाय हलत नाही ते वाल्मिकी कराड असे सांगत धनंजय मुंडे आणि वाल्मिती कराड यांच्यातील संबध …

Read More »

संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली भेट संबधित आरोपीला अटक करून कारवाई करेल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परभणीत राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या दिवसाचे औचित्य साधत शिवसेनाओएफसीचे आमदार तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज …

Read More »

राहुल गांधी यांचा मराठवाडा दौराः परभणी आणि बीडमधील मस्साजोगला भेट देणार सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तर परभणीतील राज्यघटनेच्या विटंबनेच्या प्रकरणी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी अटक केलेल्या दलित कार्यकर्ता सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस तुरुंगात असताना मृत्यू झाला. या दोघांच्या कुंटुबियांची भेट घेण्यासाठी खास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा , बीड परभणीतील मृतांना १० लाख रूपयाची नुकसान भरपाई बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, तर परभणी प्रकरणात न्यायालयीन चौकशी

बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …

Read More »