देशमुख हत्याप्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण सीआयडीसमोर शरण येण्याआधी व्हिडिओ जारी केला

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडचे माजी नगराध्यक्ष तथा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांनी आज अखेर पुणे येथील सीआयडी कार्यालयात स्वतहून शरणागती पत्करली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संतोष देशमुख यांची हत्या होवून २० झाले, तरी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिस यंत्रणेला अपयश येत होते. त्यानंतर या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि अन्य दोघेजण फरार झाल्याचे वृत्त पुढे आले. या सगळ्यात राजकिय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत होत्या. त्यामुळे वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींची अटक कधी होणार, आरोपांच्या अटकेला इतका का वेळ लागतोय असा सवाल देशमुख यांच्या कुटुंबियांकडूनही उपस्थित करण्यात येत होता. मात्र पोलिसांकडून वाल्मिक कराड यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यासाठी १ पथके स्थापन करत कराडचा शोध घेण्यात येत होता. मात्र यातील एकाही पथकाला वाल्मिक कराड याचा शोध घेता आला नाही.

तसेच वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र दोन दिवसात वाल्मिक कराज हा कधी शरण येणार अशी चर्चाही सुरु झाली. परंतु आज सकाळी अखेर सोशल मिडीयावर वाल्मिक कराड यांने स्वतःचा एक व्हिडीओ जारी करत आपण पुणे येथील सीआयडी कार्यालयात शरणागती स्विकारणार असल्याचे जाहिर केले. त्यानुसार वाल्मिक कराड हा साधारणतः१२.३० वाजता पुणे येथील सीआयडी कार्यालयसमोर येत शरणागती स्विकारली.

त्यानंतर सीआयडीच्या पथकाने वाल्मिकी कराड यांला तब्यात घेतले. त्यानंतर वाल्मिक कराड याला केज येथील न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने हजर करणार की प्रत्यक्ष तेथील न्यायालयात हजर करणार याबाबत सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्यामध्ये परस्पर मतमतांतरे झाली. मात्र त्याबाबतचा निर्णय केजच्या न्यायालयासमोर ऑनलाईन पद्धतीने हजर केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सीआयडीच्या पथकाकडून सांगण्यात आले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, SIR च्या माध्यमातून ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली; लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बुथनिहाय प्रसिद्ध करा, दावे व हरकतीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्या

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून, त्यांना मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *