मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना न सापडलेला संशयित आरोपी वाल्मिक कराड हा थेट स्वतः गाडीत बसून त्याच्यासोबत दोन चार माणसं सोबत घेऊन आला. बरं त्याने पोलिसांना दाखवून दिलं की आपण तुम्हाला मोजत नाही. तसेच सीआयडीला शरण येण्यापूर्वी त्याने जो व्हिडिओ रिलिज केला त्यात तो स्वतः सांगतो की, माझ्या विरोधात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला, त्यामुळे हा सगळा संशयाचा सापळा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी केली.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तो वाल्मिक कराड याला तीन-चार जण कन्विन्स करण्यासाठी उतरले असतील, त्याला अरे राजा पोलिसांत हजर हो, पोलिसात हजर हो राजा असे सांगत तो कन्विन्स झाल्यानंतरच तो राजा आज हजर झाला. परंतु त्याचा आका मात्र अद्यापही बाहेर आहे. पंरतु त्या राजाचा आका आहे त्याला अद्याप मंत्रिमंडळातून काढण्यात आलेलं नाही. त्यामुळे याप्रश्नासंदर्भात अजित पवार यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. परंतु राजाचा आका धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून का ठेवायचे असा सवाल करत एका मंत्र्यांच्या विश्वासू सहकाऱ्याला अटक किंवा तो शरण जातो यावरून त्या मंत्र्याने मंत्रिमंडळातून बाजूला होणं हेच योग्य असल्याचं मतही यावेळी व्यक्त केले.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, बापू आंधळे प्रकरणात आणि सोनावणे याच्या हत्येप्रकरणी जो पोलिस अधिकारी त्यावेळी केजमध्ये होता तोच महाजन आता बीडचा पोलिस इन्सपेक्टर आहे. जो यांच्या चहापान्यातील माणूस आहे. सोनावणेवर कोणी पहिल्यांदा चापट मारली, कोणी गोळी मारली यासंदर्भात सोनावणे यांच्या कुटुंबियांकडून एफआयआर करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या महाजन इन्सपेक्टरने वाल्मिक कराड चा उल्लेख एफआयआरमध्ये वाल्मिक अण्णा असा उल्लेख केला. आता आंधळे आणि सोनावणे यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांची चौकशीही यावेळी झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.
यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केले आणि यापूर्वी विधानसभेत या प्रकरणी बोलताना फडणवीस यांच्यात एक बदल झाला आहे. तो म्हणजे पूर्वी अशा प्रकरणात बोलताना देवेंद्र फडणवीस हे पुढे झुकून बोलत होते. मात्र आता ते झुकून बोलत नाही. यावरून आता ते गुन्हेगारांना माफ करतील असे वाटत नाही असेही यावेळी सांगत पण त्यांच्यात झालेला बदल हा स्वागतार्ह असल्याचे मतही यावेळी व्यक्त केली.
शेवटी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बीडमधल्या सर्व जनतेला माहित आहे की तेथील राख कोण उचलत होता, तेथील अवैध कुणाचे आहेत, तेथील रेती कोण उचलत होता त्यामुळे यासंदर्भात अधिक काय सांगणार, तो निर्ढावलेला आहे. तो सहजासहजी असा शरण येणाऱ्यातील नाही असेही यावेळी सांगत शरद पवार मुख्यमंत्री असताना डीपीडीसीला जो काही हजारो कोटींचा निधी दिला तो निधी कसा दिला जातो, त्याची टक्केवारी किती ते कसं कोणाला दिलं जात या सगळ्या गोष्टी पाह्यल्या तर फारच भयानक असून बीडच्या डिपीडीसीचा निधीचा ताबास वाल्मिक कराड यांच्याकडे होता. त्यामुळे पुढचं तुम्ही समजून घ्या असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya