तृणमूल काँग्रेसचे राजकीय सल्लागार असलेल्या आय-पॅकच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकल्यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी इशारा दिला की, जर त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर एका विशिष्ट मर्यादेपलीकडे दबाव आणला गेला, तर त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोळसा घोटाळ्यातील सहभाग असल्याचा दावा करत त्याचे तपशील उघड करतील.
कोलकाता येथे ईडीच्या छाप्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना ममता म्हणाल्या, “माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहेत. मी माझ्या पदाचा आदर म्हणून आतापर्यंत शांत राहिले आहे. माझ्यावर जास्त दबाव आणू नका. मी सर्व काही उघड करेन. संपूर्ण देशाला धक्का बसेल.”
गुरुवारी आय-पॅकच्या कार्यालयावर आणि त्याचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या कार्यालयावर टाकलेले छापे, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) तपासल्या जात असलेल्या अवैध कोळसा खाण प्रकरणाशी संबंधित आहेत. या तपासादरम्यान, ईडीने दावा केला की, अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशांचा स्रोत लपवणाऱ्या एका संस्थेने आय-पॅकसोबत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले होते.
ममता बॅनर्जी, पोलीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह तपासस्थळी दाखल झाल्या आणि फायली व पेन ड्राइव्ह घेऊन बाहेर पडल्या, तेव्हा तणाव वाढला. त्या फायलींमध्ये संवेदनशील निवडणूक रणनीती असल्याचा दावा केला.
ईडीच्या तपासात हस्तक्षेप केल्याबद्दल झालेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री ममता बँनर्जी पुढे म्हणाल्या की, अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईदरम्यान त्यांच्याशी सामना करून त्यांनी कोणताही गैरप्रकार केला नाही. त्या पक्षाच्या प्रमुख म्हणून तिथे गेल्या होत्या आणि आगामी निवडणुकांपूर्वी आपल्या पक्षाची निवडणूक रणनीती ईडीपासून वाचवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असल्याचे सांगितले.
तथापि, अनेक समीक्षकांनी प्रश्न विचारला की, जर त्या मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर पक्षाच्या प्रमुख म्हणून काम करत होत्या, तर वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकारी त्यांच्यासोबत छाप्याच्या ठिकाणी कसे जाऊ शकतात.
मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी आरोप केला की, कोळसा घोटाळ्यातील सर्व पैसा अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेला असल्याचे सांगत पुढे दावा केला की, हा निधी बंगालमधील भाजपा खासदार जगन्नाथ सरकार – ज्यांना त्यांनी “दरोडेखोर” म्हटले – आणि बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी – ज्यांना त्यांनी “गद्दार” आणि शाह यांचा “नवीन दत्तक पुत्र” म्हटले – यांच्यामार्फत वळवण्यात आला असल्याचे सांगितले.
पुढे मुख्यमंत्री ममता बँमर्जी म्हणाल्या की, त्या आपल्या पदाचा आदर म्हणून आतापर्यंत शांत राहिल्या होत्या. “ते कोळशाच्या पैशांबद्दल बोलतात. त्याचा फायदा कोणाला होतो? अमित शाह यांना होतो. हा पैसा एका देशद्रोह्याच्या माध्यमातून दिला जातो. जगन्नाथही यात सामील आहे – पुरीचा भगवान जगन्नाथ नाही, तर हा जगन्नाथ एक दरोडेखोर आहे (भाजपा खासदार जगन्नाथ सरकार). जगन्नाथच्या माध्यमातून पैसा सुवेंदूकडे जातो आणि मग तो पैसा अमित शाह यांच्याकडे जातो,” असा गंभीर आरोपही यावेळी केला.
पुढे बोलताना ममता बँनर्जी म्हणाल्या की, “ऐका, हे त्यांचे सुदैव आहे की, मी एका घटनात्मक पदावर आहे, म्हणूनच मी पेन ड्राइव्ह बाहेर काढत नाहीये. जर त्यांनी मला जास्तच त्रास दिला, तर मी तुम्हाला इशारा देत आहे – माझ्याकडे सर्व पेन ड्राइव्ह आहेत. मी सर्व काही उघड करेन. मी गोष्टी फक्त एका मर्यादेपर्यंत सहन करते. लक्षात ठेवा, एक लक्ष्मणरेषा असते,” असा इशाराही यावेळी सांगितले.
ममता बॅनर्जी यांनी बीएसएफ आणि सीआयएसएफ दलांच्या भूमिकेवरून गृहमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांनी बेकायदेशीर कोळसा तस्करी रोखण्यात अपयश आल्याचा आरोप केला.
मुख्यमंत्री ममता बँनर्जी पुढे म्हणाल्या की, तथापि, केंद्रीय यंत्रणांकडून अवाजवी दबाव आणल्यास, आपण सर्व काही उघड करण्यास तयार आहोत आणि आपल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आपल्याकडे पेन ड्राइव्ह असल्याचेही यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री ममत बँनर्जी शेवटी म्हणाल्या की, “मी राष्ट्रीय हितासाठी बोलत नाही. जर मी तोंड उघडले, तर जगभरात खळबळ माजेल,” असा इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya