एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ला, संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यावर जलिल यांचे आरोप

छत्रपती संभाजी नगरातील बायजीपुरा जिन्सी भागात महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी गेलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी इम्तियाझ जलील यांना वाहनातून बाहेर खेचून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु इम्तियाज जलील यांनी या कारणामागे भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे असल्याचा आरोप केला. ही घटना पोलिसांच्या उपस्थित झाल्याने पोलिस काय कारवाई करतात याकडे लक्ष्य राहणार असल्याचे नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलिल यांनी सांगितले.

दरम्यान या हल्ल्यात एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी झाला. सुरुवातीला इम्तियाझ जलिल यांना काही जणांनी काळे झेंडे दाखवले. मात्र जमाव आक्रमक होत असल्याचे दिसून येताच पोलिसांनी लाठी केल्याचे दिसून आले. सलिमनगर, संजयनगर भागातील पाण्याच्या टाकीजवळ जलील यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर जमले होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते कलिम कुरेशी यांच्याकडून हा हल्ला घडवून आणण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्याचा आरोप जलील यांच्या समर्थकांनी केला. तसेच तिकीट वाटपातील आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

एमआयएमने संभाजीनगर मध्ये २१ जून्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यामुळे पक्षात अंतोष निर्माण झाला होता. यामुळे काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलिल यांचे छायाचित्रही फाडून निषेध व्यक्त करण्यात आला होता.

हल्ल्याच्यावेळी इम्तियाज जलिल हे त्यांच्या वाहनाच्या पुढच्या सीटवर बसलेले होते. सुरुवातीला झेडे दाखवल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. इम्तियाज जलिल यांच्या गा़डीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या संदर्भात इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, शंभर गुंड प्रवृत्तीचे काही लोक चालून आले. हे गुंड शहरातील दोन मंत्र्यांनी पाळलेले असून त्यांनीच विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत गुंडाना मदत केल्याचा आरोप केला. तसेच पोलिस यासंदर्भात पुढील कारवाई करतील अशी आशा व्यक्त करत परंतु पुढे त्यांनी काहीच केले नाही तर आमचे आम्ही बघुन घेऊ असा इशाराही दिला.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *