Tag Archives: मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग उभारणीस मान्यता, तीन तासांचे अंतर सव्वा तासावर प्रकल्प एमएसआरडीसी राबवणार, आराखड्यासह भूसंपादनास मान्यता

नागपूर-गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यास आणि यासाठीच्या भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नागपूर ते गोंदिया सध्याच्या महामार्गाने पोहचण्यासाठी साधारणपणे ३ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. नागपूर-गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्गाच्या …

Read More »

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार ओळखपत्रे, प्रमाणपत्रे, दस्तावेजांसाठी सुलभता

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यकता असलेली ओळखपत्रे, शासकीय प्रमाणपत्रे  व विविध योजनांचा लाभ देण्याकरिता कार्यपद्धतीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या कार्यपद्धतीमुळे या प्रवर्गातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविता येणार आहेत. १८७१ साली ब्रिटिश सरकारने …

Read More »

शासन मालकीच्या चिंचोळ्या, अयोग्य आकाराच्या, लँड लॉक्ड भुखंडाच्या वितरणाचे धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

शासनाच्या मालकीच्या चिंचोळ्या, स्वतंत्ररीत्या बांधकामास अयोग्य, उपयुक्त आकार नसलेल्या (shape), सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँड लॉक्ड स्वरूपातील शासकीय किंवा नझूल जमिनींच्या वाटपासाठी धोरणास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. अशा प्रकारच्या जमिनी भूखंडधारकांना त्यांच्या विद्यमान धारणाधिकाराच्या स्वरूपानुसारच देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घराच्या मागील बाजूस असलेल्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी उमेद मॉल, महिलांसाठी न्यायालय यासह काही महत्वाचे निर्णय

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत उमेद मॉल, महिलासांठी न्यायालय, पिंपरी-चिंचवडसाठी न्यायालयासह, शेतकऱ्यांसाठी बाजारतळ, बोर आणि धाम येथील सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र गोवा येथील वकीलांसाठी ठाण्यातील जमिन देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्य …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी ८६२ कोटी २९ लाख रूपयांची तरतूद, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर, थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा) विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी …

Read More »

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली अदानीसाठी पुन्हा सवलत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष हेतू कंपनीस भाडेपट्टा कराराच्या मुद्रांक शुल्क माफ

धारावी पुनर्विकासाची निविदा जाहिर केल्यापासून अनेक विशेष अटी आणि नियमात दुरुस्ती करत अनेक सवलती राज्य सरकारकडून अदानी कंपनीसाठी जाहिर केल्या. इतकेच नव्हे तर अदानीने धारावीच्या पुनर्विकासासाठी एखाद्या मागणी प्रशासनासमोर ठेवल्यास त्यास सात दिवसाच्या आत किंवा विहित कालावधीत संबधित प्रशासनाने मान्यता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मिठागरांच्या जमिनी, मदर डेअरीची …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर शेतकऱ्यांसाठी नव्या महाॲग्री-एआय धोरणास मंजूरी

राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer Vision), रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण (Predictive Analytics) यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तारयोग्य …

Read More »

लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी तळीराम बंधूच्या खिशात राज्य सरकारचा हात महाराष्ट्रात भारतीय आणि परदेशी दारू महागणार, मंत्रिमंडळाने दारूवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला

मागील काही महिन्यापासून राज्य सरकारच्या तिजोरीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना देण्याच्या रकमेचा अधिभार पडत असल्याने सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाच्या निधीवर डल्ला मारण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका होवू लागल्याने अखेर राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या मासिक हप्त्यासाठी राज्यातील भारतीय बनावटीच्या आणि परदेशी मद्याच्या किंमतीत वाढ …

Read More »

आता शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीस मान्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचे सुधारित धोरण

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अंशकालिन निदेशकांची नियुक्ती, मानधन, शैक्षणिक पात्रता आणि कायम संवर्ग निर्मिती याबाबत आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय नागपूरातील प्रकल्प बांधितांसाठी एक हजाराचे शुल्क आणि न्यायवैद्यक विद्यापीठास जमिन

भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्यानंतर अमेरिकेच्या सांगण्यावरून भारत-पाक दरम्यान झालेली शस्त्रसंधी या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत एकूण सहा निर्णय घेण्यात आले. यापैकी दोन निर्णय हे नागपूरशी संबधित आहेत. नागपूरातील स्मार्ट सिटी प्रकल्पबाधित होम स्वीट होम च्या घरांना एक हजारांचे मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय …

Read More »