महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची भीती आहे, याचा विचार करुन पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू …
Read More »एस. चोकलिंगम यांची माहिती, मतदार याद्या होणार अधिक पारदर्शक १ लाख २५३ बुथ परिसरातील मतदारांचे राज्यभर विशेष सखोल पुनरिक्षण
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून राज्यातील सुमारे ९ कोटी ६८ लाख मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील १ लाख २५३ बुथ परिसरातील मतदारांचे विशेष सखोल मतदार पुनरिक्षण करण्यात येणार असल्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. …
Read More »विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीम पारदर्शक व निष्पक्षपणे राबवावी महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन राज्यातील निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे’ चिन्ह वापरू नका मुख्य निवडणूक अधिकारी यांची प्रसार माध्यमांना सूचना
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे, इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याचे काही प्रकरणे दिसून आली आहेत. यातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले की, संसदीय, …
Read More »काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत मतदारसंख्या वाढली असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करत ही विधानसभा निवडणूक एकप्रकारची मॅच फिक्सिंग होती असा आरोप केला. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही निवडणूक आयोगावर आरोप केले होते. मात्र काँग्रेसच्या निवडणूक आयोगावरील आरोपाला भाजपाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. तर भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांचा सन्मान निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरव
निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना आज नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. निवडणुकांचे यशस्वी आणि सुरळीत आयोजन केल्याबद्दल निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि राज्यांना विविध श्रेणीत विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ …
Read More »नाना पटोले यांचा सवाल,.. मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव का केला ? पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच
विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करु दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर …
Read More »नाना पटोले यांचे निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र फार्म १७ सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता व अंतिम निकालाची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित द्या
मतदान दिनीचा फार्म १७ सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता (परिशिष्ट-५७) व अंतिम निकाल (फार्म-२०) पडताळणी साठी याची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी करणारे फार्म १७ सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता व अंतिम निकालाची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित द्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल,…निवडणूक आयोग काय झोपला आहे का? भाजपा युतीकडून साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर, प्रचार संपल्यानंतरही भाजपा नेते विरारमध्ये काय करत होते
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. लोकशाही व संविधानाचा गळा घोटून सत्ताधारी पक्ष साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर खुलेआमपणे करत आहेत. सर्वात आश्चर्याची व गंभीर बाब म्हणजे हे सर्व घडत असताना पोलीस दल व निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का? असा सवाल करून भाजपा नेते विनोद …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज ४ हजार १४० अंतिम उमेदवार रिंगणात मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची माहिती
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या ४ हजार १४० असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आज दिली. मंत्रालय व …
Read More »
Marathi e-Batmya