Tag Archives: Anant Gadgil

अनंत गाडगीळ यांचा सवाल, आचारसंहितेत धोरणात्मक निर्णय जाहीर कसे केले ?

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांची ‘कर्जमाफी’ व नाशिकच्या कुंभमेळाव्यानिमित्त तपोवनासाठी आर्थिक तरतूद या गोष्टींना आमचा आक्षेप नाही. परंतु, महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या निमित्तानं आचारसंहिता लागू असताना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती नेमक्या निवडणूक काळातच कशा जाहीर केल्या जातात, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी विचारला आहे. अनंत गाडगीळ पुढे …

Read More »

काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा खोचक सवाल, यात मोदीजी येतातच कुठे ? सोमनाथ मंदिर : कल्पना सरदार पटेल यांची, कृती मुन्शी-गाडगीळांची, आशीर्वाद प्रसादांचा

सोमवार दि. ११ मे रोजी गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वार / पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ७५ वर्षांपूर्वी, गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले होते.  अधिवेशनादरम्यान एका सायंकाळी वेरावळ येथील कार्यक्रमात सोमनाथ मंदिरावर अनेकदा झालेल्या अतिक्रमणाचा उल्लेख करत सदर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा मानस सरदार पटेल त्यांनी व्यक्त केला.  इतकेच नव्हे तर …

Read More »

अनंत गाडगीळ यांचा सवाल, हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा भाजपाचा आदर? काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आर्की. अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ‘राजगृह’ या ऐतिहासिक निवासस्थानाला १४ एप्रिल रोजी येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेने राजगृहा समोरील पदपथावर अनेक फिरती शौचालय उभारली होती. स्थानिकांची या दिवसाबाबत तक्रारही नव्हती. तथापि आज १० दिवस उलटून गेले तरीही असंख्य अनुयायांनी वापरलेली ती फिरती शौचालये त्याच अवस्थेत असून मुंबई महापालिकेने अजून …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप, मोदींवर आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची टाळाटाळ कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, इंदिराजी गांधी व बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई मग मोदींवर कारवाई का नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली पण मोदींवर कारवाई केलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई …

Read More »

अनंत गाडगीळ यांचा सवाल, मोदी सरकारमध्ये नव्या पाणबुड्यांना अजूनही मंजुरी का नाही ? १५ पाणबुड्यांचे आयुष्य ७ ते ८ वर्षापर्यतचेच

धक्कादायक बाब म्हणजे भारतीय नौदलाकडे असलेल्या एकूण पाणबुड्यांपैकी जवळपास १५ पाणबुड्यांचे आयुष्य हे आता केवळ ७ ते ८ वर्षापर्यंतच मर्यादित आहे. याशिवाय ३ ते ४ पाणबुड्या पुढील ५ वर्षात निवृत्त कराव्या लागतील अशा अवस्थेपर्यंत पोहोचल्या आहेत. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून एकही पाणबुडी निर्मिती वा खरेदीचा निर्णय घेतलेला नाही, हे खरे आहे का? याचा …

Read More »

अनंत गाडगीळ यांचा आरोप, लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील मोदी सरकारने घालविलेली पत भारतीय सैन्याने सावरली

भारतामध्ये हवाईदलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे सदर सामुग्री हवाई दलास पुरविलीच जात नाही. ही बाब खुद्द भारताच्या हवाईदल प्रमुखांनीच दिल्लीतील एका कार्यक्रमात नुकतीच स्पष्ट्पणे मांडल्याचे काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी सांगितले. अनंत गाडगीळ पुढे म्हणाले की, २०२१ साली …

Read More »

अनंत गाडगीळ यांची टीका, गुगली ट्रम्प यांची, विकेट मोदी सरकारची भारताला जगातील इतर १३८ देशांच्या यादीत बसविले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चा फलदायी, सकारात्मक, समाधान कारक यासारखी विशेषण लावत झाल्याचे परराष्ट्र खात्यापासून ते भारतातील मोदी सरकार धार्जिण्या प्रसार माध्यमातून सर्वत्र सांगितले जात होते.   त्यातच “मोदी,  माय फ्रेंड, इज ए ग्रेट नेगोशिएटर” (मोदी व्यवहारिक वाटाघाटीत तरबेज आहेत) असे म्हणणारा डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडियो सोशल मीडियावर गेले काही …

Read More »