बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कालपर्यंत घर सांभाळा म्हणणारे अजित पवार यांनी आज अचानक सिंचन घोटाळ्याप्रकरणावरून थेट माजी गृहमंत्री तथा स्व. आर आर पाटील आणि शरद पवार यांच्यावर टीका करत मोठा गौप्यस्फोट करत आर आर पाटील यांनी केसाने गळा कापला असा धक्कादायक आरोप केला. तसेच यासंदर्भातील चौकशी लावण्यासाठी …
Read More »निवडणूक आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या – ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली माहिती
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती मुख्य निवडणूक …
Read More »उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुट्टी जाहिर
येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, याकरिता उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी उद्योग,ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जाहिर करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक …
Read More »भाजपाच्या विरोधानंतरही राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नवाब मलिक शिवाजीनगर-मानखुर्दमुधून उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म दाखल
राज्यातील विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या शिवाजी नगर-मानखुर्दमधून उमेदवारी देण्यास भाजपाने विरोध दर्शविला. तसेच नवाब मलिक यांच्या उमेदवारीसंदर्भात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्लीत भाजपाच्या नेत्याची शिष्टाई केली. मात्र भाजपाच्या नेत्यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीला नकारघंटाच कळवित विरोध केला. मात्र आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या …
Read More »आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून महायुतीचे मिलिंद देवरा यांचा अर्ज दाखल वरळीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दूत म्हणून काम करणार
शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज वरळी विधानसभा मतदार संघात महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, ‘आरपीआय’च्या हजारो कार्यकर्त्यांनी प्रचंड रॅलीतून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव किरण पावसकर, अँड. सुशीबेन शाह, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर उपस्थितीत होते. मिलिंद देवरा हे …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच मविआचे ध्येय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा हजारोंच्या उपस्थितीत साकोलीतून अर्ज दाखल
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. त्याआधी सकाळी नाना पटोले यांनी चारभट्टीचा बजरंगबली आणि गोपीपुरी बाबाच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वादही घेतले. अर्ज दाखल करण्यास जाण्याआधी पत्नीने नाना पटोले …
Read More »शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटची पाच उमेदवारांची यादी जाहिर या उमेदवारांना जाहिर केली उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज सकाळी उमेदवारांची पाचवी यादी जाहिर करण्यात आली. या पाचव्या उमेदवारी यादीच पाच जणांना उमेदवारी जाहिर करण्यात आली असून यात मुंबईतील मुलूंड, माढा, अमरावतील मोर्शी आणि पंढरपूर, मोहोळ आणि माढा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी …
Read More »शिंदे यांच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहिरः भाजपाच्या नेत्यांना उमेदवारी १५ उमेदवारांना उमेदवारी जाहिर
सत्ताधारी महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी शेवटचा अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक राहिलेला असताना १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहिर करण्यात आली आहे. या उमेदवारी यादीत भाजपाच्या शायना एनसी यांना मुंबादेवी मतदारसंघातून, आणि कन्नडमधून रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. याशिवाय …
Read More »शिवसेना उबाठाची उमेदवारी किशनचंद तनवाणींनी नाकारलीः बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी म्हणे एमआयएमचा उमेदवार निवडूण येणार असल्याने परत केली उमेदवारी
विधानसभा निवडणूकीत काहीही करून गद्दारांना धडा शिकवायचा म्हणून शिवसेना उबाठा गटाने प्रत्येक उमेदवाराची काळजीपूर्वक तपासणी करत उमेदवारी जाहिर केली. त्यासाठी निष्ठावान कोण, तोंड देखलं कोण याची रितसर खातरजमा करूनच उमेदवारांची यादीही जाहिर केली. मात्र विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आलेले …
Read More »महायुतीकडून रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या दोन जागा रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला लागावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश
रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाला महायुतीतून मुंबईत धारावी आणि कालिना हे दोन मतदार संघ देण्यात आले आहेत. तसेच महायुतीची सत्त्ता आल्यानंतर एक विधानपरिषद सदस्यत्व आणि राज्यात एक कॅबिनेट मंत्री पद तसेच ४ महामंडळ अध्यक्ष पदे आणि महामंडळ संचालक पदे जिल्हा तालुका शासकीय कमिटी …
Read More »
Marathi e-Batmya