सत्ताधारी महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी शेवटचा अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक राहिलेला असताना १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहिर करण्यात आली आहे.
या उमेदवारी यादीत भाजपाच्या शायना एनसी यांना मुंबादेवी मतदारसंघातून, आणि कन्नडमधून रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने बार्शीतून अपक्ष आमदार तथा भाजपा समर्थक राजा राऊत यांना उमेदवारी यादी जाहिर करण्यात आली आहे. तर करमाळ्यातून दिग्विजय बागल यांना उमेदवारी यादी जाहिर करण्यात आली आहे. कल्याण ग्रामीण मधून राजेश गोवर्धन मोरे यांना तर भांडूप पश्चिममधून अशोक धर्मराज जाधव यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली असून हातकणगंलेमधून अशोकराव माने आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
त्याचबरोबर धाराशिव विधानसभा मतदारसंघातून अजित बाप्पासाहेब पिंगळे यांना, गुहागर मधून राजेश रामचंद्र बेंडल यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. नेवासातून विठ्ठलराव वकीलराव लंघे पाटील यांना, श्रीरामपुरातून भाऊसाहेब मल्हारी कांबळे, संगमनेरमधून अमोल धोंडिबा खताळ यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर पुण्यातून घनसांगवी मतदारसंघातून हिकमत बळीराम उढाण यांना तर सिंदखेडराजा येथून शशिकांत नरसिंगराव खेडेकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेची जाहिर केलेली तिसरी यादी खालीलप्रमाणे

Marathi e-Batmya