भाजपाच्या विरोधानंतरही राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नवाब मलिक शिवाजीनगर-मानखुर्दमुधून उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म दाखल

राज्यातील विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या शिवाजी नगर-मानखुर्दमधून उमेदवारी देण्यास भाजपाने विरोध दर्शविला. तसेच नवाब मलिक यांच्या उमेदवारीसंदर्भात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्लीत भाजपाच्या नेत्याची शिष्टाई केली. मात्र भाजपाच्या नेत्यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीला नकारघंटाच कळवित विरोध केला. मात्र आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार नवाब मलिक यांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

विशेष म्हणजे भाजपाच्या विरोधानंतरही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना एबी फॉर्मही दिला. त्यामुळे नवाब मलिक यांची उमेदवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत करण्यात आली.
सुरुवातीला अणुशक्तीनगर मधून उमेदवारी भरणार होते. मात्र त्यातच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना विरोध दर्शविला. त्यानंतप अनुशक्तीनगर मधून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक-शेख यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच सना मलिक-शेख यांच्या उमेदवारीला भाजपाने मात्र उमेदवारी देण्यास कोणताही विरोध दर्शविला नाही. त्यामुळे सना मलिक शेख यांची उमेदवारी निश्चित माणण्यात आली. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही सना मलिक-शेख यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला.

त्यानंतर नवाब मलिक यांनी अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाला लागून असलेल्या शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडूक लढण्याची तयारी सुरु केली. मात्र भाजपाने नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्यावर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांच्या उमेदवारांसाठी भाजपाच्या विरोधासमोर झुकायचे नाही अशी धोरण स्विकारले. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांसाठी दिल्लीत भाजपाचे नेते अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली. अमित शाह यांनी नवाब मलिक यांची उमेदवारीला विरोध केला.

त्यानंतर अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी नवाब मलिक यांच्या घरी जाऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही नवाब मलिक यांनी शिवाजी नगर-मानखुर्द मधून निवडूक लढणार आणि जिंकणारही अशी भूमिका जाहिर केली. नवाब मलिक यांच्या घोषणेनंतर अखेर अजित पवार आणि राष्ट्रवादीने अंतर राखण्यास सुरुवात केली. अखेर नवाब मलिक यांनी आज उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरत मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केले. परंतु नवाब मलिक हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ए बी फॉर्मही दिला गेला. मात्र भाजपाकडून नवाब मलिक यांच्या विजयासाठी भाजपा कोणतीही मदत करणार नसल्याची घोषणा केली. त्यामुळे नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाचा अद्यापही विरोध असल्याचे दिसून येत आहे.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांची मागणी, राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक, संयुक्त समितीकडे पाठवा विश्वस्त मंडळावर लोकप्रतिनिधी,राजकीय व्यक्ती नसाव्या, विश्वस्त मंडळावरील सदस्यांना भत्ते देऊ नये

विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ यावर चर्चा करताना काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *