अजित पवार यांचा मोठा आरोप, आर आर पाटील यांनी केसाने गळा कापला… ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा पहिल्यांदाच वक्तव्य

बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कालपर्यंत घर सांभाळा म्हणणारे अजित पवार यांनी आज अचानक सिंचन घोटाळ्याप्रकरणावरून थेट माजी गृहमंत्री तथा स्व. आर आर पाटील आणि शरद पवार यांच्यावर टीका करत मोठा गौप्यस्फोट करत आर आर पाटील यांनी केसाने गळा कापला असा धक्कादायक आरोप केला. तसेच यासंदर्भातील चौकशी लावण्यासाठी तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली.

तासगांव प्रचारार्थ आयोजित जाहिरसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, केवळ मला बदनाम करण्यासाठी सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. पण महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी रूपयांचा होता. मग ७० हजार कोटी रूपयांचा खर्च आलो कोठून होणार असा सवाल करत पण आकाडाच एवढा मोठा होता की माझी बदनामी झाली. पुढे चौकशीसाठी एक फाईल तयार केली गेली. ती फाईल गृहमंत्री आर आर पाटील यांच्याकडे गेल्यानंतर ती आर आर पाटीलनं माझी खुली चौकशी करण्यासाठी फाईलीवर सही केली. केसानं गळा कापायचे धंदे झाले ना राव असे सांगत एकप्रकारे आर आर पाटील यांच्यावर आरोप केला.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, नंतर आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतला अनं सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागल्याने तत्कालीन राज्यपालांनी फाईलीवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. आणि निवडून आलेलं सरकार यावर निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस याचं सरकार सत्तेवर आलं अनं देवेंद्र फडणवीस यांनी त्या फाईलीवर सही केली. त्यांनी मला घरी बोलावलं आणि फाईल दाखविली आणि सांगितलं की तुमच्या आबाने तुमची चौकशी करण्यासाठी या फाईलीवर चौकशी करण्यासाठी या फाईलीवर सही केली आहे. आता मला मुख्यमंत्री म्हणून सही करावी लागेल. मला त्या दिवशी खुप वाईट वाटल्याचेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, आर आर पाटील यांना जाऊन नऊ वर्षाहून अधिकचा काळ लोटला. इतके दिवस काय अजित पवार झोपलं होते का असा सवाल करत एखाद्याचा मृत्यू झाल्यावर सदर व्यक्तीबाबत वाईट बोलण्याचा मराठी धर्म नाही तसेच हिंदू धर्मातही तसे नाही. मग इतका काळ गेल्यानंतर आज जाग आली का असा सवालही यावेळी अजित पवार यांना केला. आतापर्यंत दोन निवडूका झाल्या मात्र याबाबत काही बोलला नाहीत. मग आताच का बोलले असा सवाल करत आता देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर अजित पवार यांचा विश्वास बसणे साहचिकच आहे कारण आता ते त्यांच्या मांडीवर बसले आहेत अशी खोचक टीकाही यावेळी.

तर आर आर पाटील यांचे सुपुत्र तथा तासगांव-कवठे महाकांळचे उमेदवार रोहित पाटील म्हणाले की, आर आर पाटील यांनी सक्षमपणे गृहमंत्री पद सांभाळले. त्यांच्यावर असा पद्धतीचे आरोप होत असतील तर ते दुर्दैवी असल्याचे सांगत पुढे म्हणाले की, आज आबा जाऊन नऊ वर्षे झाली. आज जर ते ह्यात असते तर अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर दिले असते. तासगावात त्यांच्या उमेदवाराची परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे अजित पवार हे जाहिर सभातून असे आरोप करत असतील असे प्रत्युत्तर दिले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *