नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारमधील विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल राज्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी नियमबाह्य पध्दतीने गायरान जमिनचे वाटप केले. त्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढत सत्तार यांचा निर्णय रद्दबातल ठरविला. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत स्थगन …
Read More »अजित पवार यांचा सवाल, जाहिर केल्याप्रमाणे सीमाप्रश्नी विधेयक का आणले नाही? सीमावादावर ठराव आणण्याबाबत विरोधक आक्रमक, देवेंद्र फडणवीसांची माघार
कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विरोधात पुन्हा एकदा भूमिका मांडली. मात्र मुंबईत झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीत सीमाप्रश्नी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेत ठराव मांडून तो मंजूर करण्याचे ठरले. मात्र दुसरा आठवडा सुरु झाला तरी अद्याप ठराव का आणला जात नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. विधानसभेचे …
Read More »नारायण राणे यांचा आदित्य ठाकरेंना इशारा, तुला सोडणार नाही… दिशा सालियन मृत्यूप्रकरणी दिला पुन्हा इशारा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची व्यवस्थापिका दिशा सालियन हीचा मृत्यू झाला. त्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर सूचक शब्दात आरोप करत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर शिवसेनेकडून त्यास प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणावरून शिंदे …
Read More »राज ठाकरे म्हणाले, ‘हे पोट्टं काय करणार?’, एके दिवशी वरवंटा फिरविणार नागपूर येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पत्र वाटप करताना दिला इशारा
मागील काही दिवसांपासून विविध प्रश्नी मनसे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या पक्षाची भूमिका कधी दौऱ्यातून तर कधी जाहिर सभांमधून मांडत आहेत. मात्र त्यांना घेतलेल्या भूमिकेच्या नेमकी उलट घडत असल्याने राज ठाकरेंचा मनसे यंदातरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भोपळा फोडणार का? अशी उपाहासात्मक चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. यापार्श्वभूमीवर राज ठाकरे …
Read More »जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे? राष्ट्रवादी काँग्रेसला दुखावणे महागात पडण्याची शक्यता
काल बुधवारी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची संधी नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका अशी नार्वेकरांना उद्देशून शेरेबाजी केली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई शिंदे-फडणवीस सरकारने केली. मात्र आता या घटनेचे भलतेच पडसाद उमटू लागल्याने जयंत पाटील …
Read More »विरोधकांना बोलण्याची संधी नाकारल्याने जयंत पाटील म्हणाले, तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका… अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील निलंबित
आज विधानसभेत फोन टॅपिंगच्या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियन आत्महत्या प्रकरण पुढे आणण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरळीत झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांना बोलू देण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे विरोधक आपल्याच …
Read More »दिशा सालियनप्रकरणी फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवार म्हणाले, तीच्या आईवडीलांची तरी… सीबीआयला त्यात काही आढळून आले नाही
विरोधकांच्या फोन टॅपिंगच्या मुद्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गट आणि भाजपाने पध्दतशीरपणे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी दिशा सालियन आत्महत्या प्रकरण बाहेर काढले. तसेच सत्ताधारी आमदारांच्या मागणीनुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्याची घोषणाही विधानसभेत केली. मात्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सालियनच्या आई-वडीलांनी केलेल्या आवाहनाची …
Read More »फोन टॅपिंगच्या मुद्याला शिंदे-फडणवीसांकडून दिक्षा सालियन प्रकरणाचे प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मुद्दा उपस्थित केल्याने सभागृहात गोंधळ
शिंदे-फडणवीस सरकारने फोन टॅपिंगच्या मुद्यावरून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना अभय दिल्याप्रकरणी विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेत आज विधानसभेत सभात्याग करत आपला विरोध दर्शविला. मात्र विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्याला प्रत्युत्तर म्हणून स्व.अभिनेता सुशांत सिंह रजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या आत्महत्येचे प्रकरण शिंदे गटाचे प्रतोद आणि आमदार भरत गोगावले आणि भाजपाचे …
Read More »नाना पटोलेंचा आरोप, फोन टॅपिंगप्रकरणात रश्मी शुक्लांना अभय देण्यामागे गृहमंत्री फडणवीस विधानसभा अध्यक्षांच्या हेकट स्वभावामुळे विरोधकांचा विधानसभेत सभात्याग
फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरु असताना शिंदे-फडणवीस सरकारने क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यावर उच्च न्यायालयाने कशाच्या आधारे हा क्लोजर रिपोर्ट सादर केला असा सवाल उपस्थित करत या प्रकरणी इतकी घाई का असा सरकारला विचारला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सकाळी विधानसभेत उपस्थित करत …
Read More »छगन भुजबळ यांच्या फोटो मॉर्फिंगप्रकरणी भाजपाच्या भातखळकरांवर कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधत आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर …
Read More »
Marathi e-Batmya