मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात आतापर्यंत विद्यमान आमदार, खासदार किंवा कोणताही लोकप्रतिनिधीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या लोकप्रतिनिधीने केलेल्या कामाची पावती अथवा त्याने केलेल्या कष्टाला पोहोच म्हणून त्या व्यक्तीच्या घरातील कोणाही एकाला राजकिय वारसदार म्हणून त्या राजकिय पक्षाकडून जाहीर केले जाते. परंतु भाजपने त्यांच्या पक्षाचे निष्पृह आणि स्वच्छ चारित्र्याच्या व …
Read More »सुप्रिया सुळे यांच्या आरोपामुळे माझा राजकिय भाव वाढला भाजप आमदार प्रसाद लाड यांचा उपरोधिक टोला
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी पक्षात असताना मला पवार साहेब नेहमी सांगायचे क आरोप झाले की तो माणूस मोठा होतो, या शरद पवार यांच्या सांगण्यानुसार आता माझ्यावर सुप्रिया सुळे यांनी आरोप केल्याने माझा राजकिय भाव वाढल्याचा दावा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला. तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळीही मी बिझनेस …
Read More »अखेर भाजपमध्ये उपेक्षित असलेल्या माधव भांडारी यांना मिळाला मंत्री पदाचा दर्जा महाराष्ट्र राज्य पुर्नवसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता भारतीय जनता पार्टीचे इमाने इतबारे काम करणाऱ्या पक्षाचे प्रवक्त माधव भांडारी यांना दोन वेळा आमदारकीची हुलकावणी मिळाल्यानंतर अखेर मंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांना महाराष्ट्र राज्य पुर्नवसन प्राधिकरण तथा राज्य पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्ष पदी …
Read More »उद्दीष्ट एकच, २०१९ ला भाजप आणि मित्र पक्षाला सत्तेवरून घालविणे साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मित्र लोकशाहीचे फोरमची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी मित्र लोकशाहीचे (Friends of Democracy) हा फोरम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. तरीही त्याचे प्रमुख उद्दिष्ट मात्र राजकीय आहे. म्हणजेच आज केंद्रात सत्तेत असणाऱ्या मनुवादी व लोकशाही विरोधी भाजपा व त्याच्या मित्र पक्षास २०१९ मधील निवडणुकीमध्ये सत्तेतून पायउतार करणे, हेच ह्या फोरमचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. त्यासाठी …
Read More »युतीसाठी शिवसेनेची तयारी नसले तर भाजपही स्वबळावर निवडणूक लढवेल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही इशारा
मुंबई : प्रतिनिधी राज्यात शिवसेनेने स्वबळावर निवडणूका लढविण्याची घोषणा केल्यानंतर भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र युतीसाठी शिवसेनेची तयारी नसेल तर भाजपही स्वबळावर निवडणूकीला सामोरे जात २८८ जागी निवडणूक लढवित सत्ता मिळवू असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला दिला. विशेष म्हणजे राज्य सरकारने प्लास्टीक बंदी संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या …
Read More »भ्रष्ट आणि घोटाळेबाज राजकारण्यांची मालमत्ता लवकरचं सरकार जमा होणार पावसाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याच्या हालचाली
मुंबई : गिरिराज सावंत लोकसेवक तथा लोकप्रतिनिधींची आणि प्रशासनातील व्यक्तींकडून संगनमताने सरकारी निधींमध्ये भ्रष्टाचार करण्याचे प्रकार राजरोस करण्यात येण्यात येतात. मात्र आता अशा भ्रष्ट आणि घोटाळ्यातून मालमत्ता कमाविणाऱ्या लोकसेवक अर्थात लोकप्रतिननिधींची मालमत्ताच सरकार जमा करण्यात येणार असून आगामी पावसाळी अधिवेशनात ही या संबधिचे विधेयक विधिमंडळाच्या विधान परिषद आणि विधानसभेत मंजूर …
Read More »चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करण्यास काँग्रेसचा पाठिंबा अपयशी ठरल्याने मोदींकडून उपोषणाचे ढोंग: अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या केली. चायरे कुटुंबियांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाचा त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. कुटुंबियांच्या मागणी प्रमाणे चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर …
Read More »विरोधकांच्या उपोषणाला भाजपचे निषेध उपोषणाचे प्रतित्तुर पंतप्रधान, मुख्यमंत्री, अमित शहासह केंद्रीय मंत्री, आमदार-खासदारांचे देशभरात उपोषण
मुंबई : प्रतिनिधी देशात शांतता आणि सलोखा कायम रहावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकारात्मक कारभाराच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसने देशभरात एकदिवसीय उपोषण केले. त्यास प्रतित्तुर म्हणून भाजप अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधकांनी कामकाज चालू दिले नसल्याच्या निषेधार्थ आज एकदिवसीय उपोषण करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »नारायण राणेंची कसोटी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार पराभूत होण्याची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी लागणार असून यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पर्यायाने नारायण राणे यांच्या राजकीय नेतृत्त्वाची कसोटी लागणार आहे. काँग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामीलही केला. राज्याच्या राजकारणात राहण्याची शक्यता मावळल्यानंतर …
Read More »विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी केली सांसदीय संकेताची ऐसी तैसी भाजपच्या जाहीर कार्यक्रमास आवर्जून हजेरी
मुंबई : प्रतिनिधी राज्यघटनेने निर्माण केलेल्या कायदेमंडळाच्या अर्थात लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेच्या अध्यक्ष, सभापतींनी एकदा यापैकी कोणत्याही पदाचा पदभार स्विकारला की, त्यांनी निकोप कायदे मंडळ चालविण्यासाठी पुन्हा स्वपक्षाच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमाला हजर रहायचे नसते असे सांसदीय संकेत आहेत. मात्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भाजपच्या बीकेसीतील स्थापना दिवसाच्या …
Read More »
Marathi e-Batmya