कोरोनामुळे नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे वर्षभरातील किमान एक अधिवेशन नागपूरात घेतले जाते. त्यानुसार नियोजित हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाय येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नियोजित नागपूरचे अधिवेशन यंदा मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यातील प्रमुख महानगरे असलेल्या मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये मागील काही काळात कोरोनाची संख्या सातत्याने वाढ होत होती. मात्र ऑक्टोंबर महिन्यात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर शहरातील संख्येत घट झाली. मात्र नागपूरातील कोरोनाबाधित आणि मृतकांच्या संख्येत सातत्याने वाढच होताना दिसत आहे. तसेच दुसरी लाट आली तर मुंबईहून नागपूरात गेलेल्या सर्व लोकप्रतिनिधींसह सरकारी कर्मचाऱ्यांनाही बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर येथील नियोजित अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनाचा कालावधी अद्याप निश्चित झालेला नाही. परंतु त्यासंदर्भात पुन्हा आयोजित केलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राज्याचे आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरला घ्यावे अशी मागणी काही नेत्यांनी केल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करा आपत्तीच्या काळातही अखंडित वीज पुरवठ्यासाठी 'इन्फ्रास्ट्रक्चरल अपग्रेडेशन'

पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *