Tag Archives: deputy chief minister

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे सात महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस हे होते

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना, अहिल्यानगर मधील हरेगांव मळ्याच्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळणार, महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष (महा-टॅक) स्थापन करणार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला भाडेपट्टयाचे मुद्रांक शुल्क माफ, महाराष्ट्र …

Read More »

मनोज जरांगेंच्या मोर्चावरून एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणीही राजकिय भूमिका घेऊ नये गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय घेत उपोषणास सुरुवात केली आहे. त्यातच उपोषणाचा आज १८ वा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र अद्याप पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अद्याप परवानगी दिली नाही. परंतु मुंबईत पोहोचल्यावर …

Read More »

अमित शाह यांची अपेक्षा, लॅबग्रोन डायमंडच्या संपूर्ण मूल्यसाखळीत भारताने जागतिक नेतृत्व करावे नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्कमुळे एक लाख कोटींची गुंतवणूक, ५० हजार रोजगार अपेक्षित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिने उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारावी. या उदयोन्मुख क्षेत्रात भारतीय उद्योगाने जागतिक नेतृत्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. भारतातील रत्न व आभूषण उद्योगातील उत्कृष्टता, नेतृत्व आणि उल्लेखनीय …

Read More »

सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित…शिस्तबद्ध साजरा करूया उपमुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा

पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक पार पडली. यावेळी …

Read More »

एकनाथ शिंदे यांची घोषणा, पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करणार महाराष्ट्र मंडळाच्या सोहळ्यात 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्काराने उपमुख्यमंत्री सन्मानित

जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लंडन येथील ऐतिहासिक अशा महाराष्ट्र मंडळाने त्यांचा ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र भवनातील वातावरण मराठीमय होऊन गेले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा पुण्यातील वाहतूक व्यवस्था वेगवान करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून निर्धार व्यक्त

बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्याला देशातील आधुनिक आणि वेगवान मोबिलिटी असलेले शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या …

Read More »

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन, मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ, गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट

मुंबईतील विद्यमान रेल्वे व्यवस्था विश्वासार्ह असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिचे उन्नयन करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विविध कामे सुरू आहेत. सध्या दररोज धावणाऱ्या सुमारे ३ हजार २०० लोकल फेऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून २०३० पर्यंत ३ हजार ५०० पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट …

Read More »

आरोग्य विभागाकडून ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’ची स्थापना शहरी आरोग्य सेवेला येणार अधिक बळकटी

राज्यातील शहरी भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि राष्ट्रीय व राज्य आरोग्य कार्यक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’ स्थापन करण्यात आले आहे. या आयुक्तालयाची प्रशासकीय रचना सक्षम करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एप्रिल २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले. …

Read More »

सुनेत्रा अजित पवार यांची माहिती, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी बीडच्या विकासाला नवी गती १७ सप्टेंबरला रेल्वेची पुण्याशी तर डिसेंबरमध्ये मुंबईशी जोडणी

बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी ‘बीड–पुणे’ रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या …

Read More »

सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश , सहकारी साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन योजना’ मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा सहकारी साखर कारखान्यांमधून तयार होणाऱ्या उपपदार्थांसाठी स्वतंत्र धोरण आखणार

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी, या उद्देशाने केंद्रसरकारच्या धर्तीवर राज्यात ‘सॉफ्ट लोन योजना लागू  करण्यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करावा,असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. ​सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी साखर कारखान्यांसाठी …

Read More »