Tag Archives: deputy chief minister

टीम जुनीच पण अजित पवार यांची खुर्ची…एकनाथ शिंदे यांचा टोला, तर अजित पवार म्हणाले…. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत संवाद

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी शेतकरी विरोधी आणि विसंवादी सरकार अशी टीका करत बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही आवर्जून उपस्थित राहिले. मात्र या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील …

Read More »

वक्फ बोर्ड निधीः शिंदे यांच्या काळात वाद, तर फडणवीसांच्या काळात निधी देऊनही शांतता आता कोण आंदोलन करणार, भाजपाशी संबधित कोणी बोलेचना

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांकडून आणि विविध राज्यातील राज्यांच्या सरकारकडूनही मुस्लिम धर्मियांना उद्देशून सातत्याने टार्गेट करणारी वक्तव्ये केली जात आहेत. त्यातच महाराष्ट्रातही नव्याने सत्तास्थानी विराजमान झाल्यापासून आणि त्यापूर्वीही भाजपाचे आमदार आणि बंदरे मंत्री नितेश राणे हे ही  सातत्याने मुस्लिम धर्मिय लोकांना उद्देशून चितावणीखोर वक्तव्य करत असतात. मात्र …

Read More »

स्वारगेट बलात्कार प्रकरणी आदेश देण्यास पालकमंत्री अजित पवार यांना लागले १२ तास स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी

मुंबईनंतर वर्दळीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐन पुणे शहराच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटेच्यावेळी एका २६ वर्षिय युवतीवर बलात्काराची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणी राज्यातील राजकारणात पडसाद उमटायला सुरुवात झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मात्र या घटनेची सविस्तर माहिती कळण्यास एक नाही दोन …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, मुंबईतील ओव्हल, आझादसह क्रॉस मैदानाच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी नवे धोरण राज्यातील खेळाच्या मैदानांचा फक्त खेळासाठीच वापर व्हावा; मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहांसह चेंजिंग रूम उभारा

खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान व क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचे क्रीडा क्लबसोबत नूतनीकरण करण्यासाठी महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने स्वतंत्र, सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोणत्याही परिस्थितीत खेळांची मैदाने केवळ खेळांसाठीच वापरण्याच्या सूचनाही …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आदेश, मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करा मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत दिले आदेश

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मराठी भाषा विभागाने मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठी भाषा विभागाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. …

Read More »

अजित पवार यांनी घेतला ‘पीएमयू’च्या कामाचा आढावा राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी

राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच पुण्यात ‘एम्स’च्या उभारण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारा राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत ‘महामेट्रो’ने समन्वयाने काम करा

शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार होण्याबरोबरच वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन प्रकल्पास मंजूरीः निर्णय काही दोन-तीनच्या पुढे सरकेना पालघरमधील देहरजी आणि पुण्यातील जनाई शिरसाई वाढीव प्रकल्पास मान्यता

राज्यात भाजपा आणि महायुतीला जनतेने मोठ्या प्रमाणावर मतांचे दान देत विश्वास दाखविला. मात्र राज्यात सरकार स्थापन होऊन, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन तीन महिने झाले तरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची संख्या काही केल्या दोन ते तीनच्या पुढे जायला तयार नाही. त्यातच आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकतर जलसंधारण प्रकल्पाच्या वाढीव खर्चास नाही जर …

Read More »

राज ठाकरे- मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, एकनाथ शिंदे यांनी नियोजित बैठका केल्या रद्द अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठका आणि एमएसआरडीची आढावा बैठका पुढे ढकलल्या

मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून धुसफुस सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकिय सौख्य काही राहिल्याचे दिसून येत नसल्याची कुजबुज सध्या सुरु असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून महायुतीतील शिवसेना …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे निर्देश, ड्रायव्हर, कंडक्टरसाठी वातानुकुलित विश्रांती गृह बांधा प्रत्येक एसटी स्टँडवर उपलब्ध करून द्या

एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ” प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!” समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन …

Read More »