अटल सेतू, मुंबई-पुणे महामार्ग मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पांमुळे पुणे आणि मुंबई ही महानगरे जवळ आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. विकास प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची असून प्राधिकरणाने पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास करावा, अशा सूचना …
Read More »बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एनकांऊटरची सीआयडी चौकशी ठाणे पोलिसांनी यासंदर्भात सीआयडी आणि ह्युमन राईटला पाठवले पत्र
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांनी केलेल्या एनकांऊटरमध्ये मृत्यू झाला. या एनकांऊटरनंतर राज्यातील सर्वच स्तरातून पोलिसांच्या या एनकांऊटरवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून विरोधकांनी तर राज्य सरकारलाच धारेवर धरले. दरम्यान अक्षय शिंदे एनकाऊंटर प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून करण्यात येणार असल्याची पुढे येत आहे. ठाणे पोलिसांनी शिष्टानुसार यापूर्वीच …
Read More »राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. ‘अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे २४ महत्वाचे निर्णय ब्राम्हण परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसह दूधाच्या अनुदानात वाढ
मागील काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वहात आहे. यापार्श्वभूमीवर जास्तीत जास्त राज्यातील मतदारांना खुष करण्यासाठी निर्णयांचा धडका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने घेतला आहे. त्यातच प्रत्येक राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत १० ते १५ विषयांवर निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारने आज तब्बल २४ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. विशेष म्हणजे …
Read More »बौद्ध भंतेजींसाठी वर्षा निवासस्थानी चिवरदान, धम्मदान व भोजनदान सोहळा जगाला युद्ध नको बुद्ध हवाय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर आज रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान व भोजनदान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन संकुलाच्या कोनशिलेचे सरन्यायाधीशांकडून अनावरण सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री शिंदे याच्या उपस्थित पार पडणार
मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल हे वांद्रे पूर्व, मुंबई येथे बांधण्यात येणार असून सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे. कोनशिला अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती …
Read More »जुहू किनाऱ्यावर राज्यपाल राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री शिंदे यांची स्वच्छता मोहीम आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान
प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. …
Read More »अखेर भरत गोगावलेंना मिळाले मंत्री पद, पण दर्जा दिलेले महामंडळाचे अध्यक्ष पद एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली निवड
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आपल्याला नक्की कॅबिनेट मंत्री पद मिळणार आणि रायगडचा पालकमंत्री मीच असणार असा दावा रायगडमधील आमदार आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे सातत्याने जाहिररित्या बोलत होते. मात्र राज्यातील सरकार जाण्याची वेळ आल्यानंतर शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा दिलेले एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद देऊ …
Read More »अजित पवार यांची वाचाळवीरांना तंबी, योजनेसाठी महायुतीलाच मतदान करा सुखासमाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही- मुख्यमंत्री शिंदे
राज्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांच्या राहुल गांधी यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आज काँग्रेस पक्षाकडून सत्तातारी भाजपा आणि महायुतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील वाचाळवीरांना थेट तंबी दिली. तसेच आवाहन केले की, हा महाराष्ट्र फुले शाहु आंबेडकरांचा …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, सेमी कंडक्टर उद्योगात ४०० जणांना रोजगार आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करीत आहे आणि यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापे एमआयडीसी येथे केले. ठाणे जिल्हातील महापे एमआयडीसी येथे मे.आर.आर.पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स …
Read More »
Marathi e-Batmya