Tag Archives: election

वर्षा गायकवाड यांचा आरोप, जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा भाजपा डाव भाजपा सरकार फक्त लाडके उद्योगपती व कंत्राटदारांचे

निवडणुका आल्या की भारतीय जनता पक्ष जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवत असते. लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपा समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणातही भाजपा द्वेषाचे विष कालवत आहे. भाजपाच्या कटेंगे, बटेंगे, एक है तो सेफ है, अशा विषारी प्रचाराला बळू पडू नका, …

Read More »

तेज प्रताप यादव यांचा निर्धार, परत जाण्यापेक्षा मृत्यू निवडेन लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत परत जाण्यास नकार

बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी शुक्रवारी राष्ट्रीय जनता दलात (राजद) परतण्याची कोणतीही शक्यता फेटाळून लावली आणि ते म्हणाले की ते त्यांचे वडील लालू प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील पक्षात “परत जाण्यापेक्षा मृत्यू निवडेन. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, जनशक्ती जनता दल (जेजेडी) चे प्रमुख असलेले तेजप्रताप यादव म्हणाले की, ते सत्तेने …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, तक्रार करण्यासारखे काही घडलेले नाही इंडिया आघाडीत मनसेचा अद्याप प्रस्ताव नसल्याने भाष्य करण्याचा प्रश्न नाही

निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ राज्य निवडणूक आयोगाने दिली माहिती

राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या …

Read More »

छगन भुजबळ यांचे आवाहन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुढे न्या

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयार असायला हवे. या काळात आपल्यावर अनेक हल्ले होतील मात्र न घाबरता न डगमगता आपल्याला त्यावर प्रतिहल्ला करावा लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर मत चोरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात जयंत पाटील यांचे मार्गदर्शन यांचे

लोकसभेत आपल्या पक्षाने दहा पैकी आठ जागा जिंकत उत्तम कामगिरी केली. व्होट चोरीचे प्रकरण झाले नसते तर शशिकांत शिंदे यांची जागा देखील आपण जिंकलीच होती. विधानसभेत दुर्दैवाने अनपेक्षित निकाल लागला. असा निकाल का लागला याची कारणे आता पुढे येऊ लागली आहेत. पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर …

Read More »

उद्धव ठाकरे- राज ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकारणाची समिकरणे बदलणार ? आज उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर

राज्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार असल्याची चर्चा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या भूवया उंचावल्या आहेत. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. या राजकीय …

Read More »

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची २१ नेत्यांची टीम शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे असेल. आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात …

Read More »

आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल मानले आभार

बीएमसी निवडणुकीपूर्वी अंधेरी (पश्चिम) येथील भाजपा आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईसाठी पक्षाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आमदार अमित साटम यांनी सांगितले. आमदार अमित साटम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

भाजपाकडून विधान परिषदेसाठी ३ जणांची नावे जाहिरः अर्जाचा शेवटचा दिवस सोमवार शिंदे शिवसेनेने कडून आणि अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारांची चाचपणी

विधान परिषदेतील पाच सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. या पाच जागांसाठी भाजपाचे तीन आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या हिश्शाला प्रत्येकी एक उमेदवार असे मिळून पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून तीन …

Read More »