Tag Archives: election

या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदानादिवशी सुट्टी ७ फेब्रुवारीस मतदान, उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक  होत आहे. या निवडणुकीमध्ये  राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे. यानुसार, निवडणूक  होणाऱ्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा विश्वास, या जि.प, पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल भाजपा व एमआयएम एकाच नाण्याचा दोन बाजू, मोहम्मद अली जीना व भाजपाची जुनीच युती, आता त्याच युतीचे पुनरुज्जीवन

राज्यात व केंद्रात १९९९ नंतर आघाडीचे राजकारण सुरु झालेले आहे. आघाडीच्या राजकारणात दोन पावलं मागे घ्यावी लागतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना दिले होते. नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, ओबीसी बहुजन व काँग्रेस आघाडी, जि.प. पंचायत समिती लढणार धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी सर्वच समाजाची फसवणूक करून फडणवीसांनी राज्यात जातीय संघर्ष पेटवला

प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. ही एक वैचारिक आघाडी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी …

Read More »

इराणमधील विरोधी निदर्शनात ५०० सुरक्षा रक्षकांसह ५ हजार लोकांचा मृत्यू १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच मोठी निदर्शने

इराणमधील एका प्रादेशिक अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, देशभरातील निदर्शनांमध्ये आतापर्यंत सुमारे ५०० सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान ५,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी “दहशतवादी आणि सशस्त्र दंगलखोरांनी” निष्पाप नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्याने सांगितले की हे आकडे पडताळले गेले आहेत आणि अंतिम मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाही. …

Read More »

पुणे महानगरपालिकेकरिता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध पुण्यात पाणी, वाहतूक आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवू; इच्छाशक्ती असेल तर बदल शक्य

पुण्याच्या प्रश्नांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि त्यावर उपाय काढण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले आहे. पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळी पुण्यात …

Read More »

सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या पहिल्या २० उमेदवारांच्या यादीत या उमेदवारांना संधी प्रकाश यलगुलवार यांच्या सुनेला, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रतिक्षा प्रविण निकाळजे यांना पुन्हा उमेदवारी

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस जय्यत तयारीनिशी उतरत आहे. आज सोलापूर महानगरपालिकेसाठी २० उमेदवारांची पहिली यादी पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी मागणी केली. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची घोषणा, मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार समविचारी पक्षांना सोबत घेऊ, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांना मुंबईकर धडा शिकतील – खासदार वर्षा गायकवाड

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्या अशी कार्यकर्त्यांची भावना आहे म्हणून मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. मुंबई काँग्रेसच्या पॉलिटीकल अफेअर्स कमिटीची बैठक आज पार पडली. …

Read More »

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाठवला प्रस्ताव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोगाच्या कार्यालयात …

Read More »

बिहारच्या निवडणूकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तान आणि काँग्रेसवर केली टीका ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरली नाही

काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला की, पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट होत असताना पक्षाच्या ‘राजघराण्या’ची झोप उडाली असून, पाकिस्तान आणि काँग्रेसचे दोन्ही नामदार अद्याप ऑपरेशन सिंदूरमधून सावरलेले नाहीत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज, भारत दहशतवाद्यांना त्यांच्याच लपलेल्या ठिकाणी शोधून काढत आहे. अलिकडेच आम्ही ऑपरेशन सिंदूर चालवले. आम्ही आमची …

Read More »

एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देत, संत तुकाराम महाराजांची मूर्ती दिली भेट

एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे, असेही यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »