मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्रात गुंतवतणूक करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तीन कंपन्यांशी करार केलेला असून …
Read More »दावोसमध्ये पहिल्याच दिवशी राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
स्वित्झर्लंड येथील दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्री सामंत म्हणाले, आज दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून …
Read More »जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा फलदायी
राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली व गुंतवणूक वाढीबाबत सकारात्मक चर्चा केली. ट्रम्प कंपनी पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात सुमारे तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जर्मनी दौऱ्यात सामंत यांनी …
Read More »नैना क्षेत्रातील विकास नियंत्रण नियमावलीत बदलाबाबत लवकरच प्रस्ताव उद्योग मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरीता (नैना) लागू असलेल्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा प्रस्ताव सिडकोने राज्य शासनास मंजूरीकरीता सादर केला असून, यामध्ये धोकादायक तथा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची तरतूद अंतर्भूत करण्याचे प्रस्तावित आहे. यावर नगररचना संचालकांचे अभिप्राय मागविण्यात आले असून ते प्राप्त होताच लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात …
Read More »छगन भुजबळांचा उद्योग मंत्र्यांना प्रश्न, निवडणूका झाल्या; गुजरातला गेलेले उद्योग परत येणार का? राहुल नार्वेकर यांचा टोला, भुजबळ साहेब आता काय अभिनंदनाचा ठराव मांडणार का?
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क, ड्रग्ज पार्क सारखे मोठे प्रकल्प गुजरातला नेल्यावरून तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आकाशपाताळ एक करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. मात्र प्रत्यक्ष ज्यावेळी हा प्रश्न विधानसभेत महाविकास आघाडीतील माजी मंत्री छगन भुजबळ …
Read More »उदय सामंत म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी पुण्यातील ‘ही’ कामे सुरु पुणे मनपामधील पाणीपुरवठा आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य
पुणे शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना प्रकल्पांतर्गत कामे सप्टेंबर २०२३ पूर्वी आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे या प्रकल्पाची कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. ही कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य सुनील …
Read More »शिंदे गटाचे मंत्री म्हणतात, नवीन वर्षात तुम्हाला नव्या घडामोडी आहेत त्या कळतील ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश
सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या मंत्री आणि आमदारांच्या विरोधात आधीच वातावरण तापलेले आहे. त्यातच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या सर्व घटनांच्या …
Read More »शिंदे गटाच्या उद्यमशील मंत्र्याचा असाही फंडा, बोलवा बैठक द्या दम, अन् घ्या ‘धनलक्ष्मी’ लॉटरी कंपन्या आणि विभाग प्रशासन वैतागले
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकते शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थानापन्न झाले. त्यानंतर महाराष्ट्रातून चार मोठे उद्योग निघून गेले. त्यावरून राज्यातले राजकिय वातावरणही चांगलेच तापले. मात्र या मागील चार महिन्यात शिंदे गटाच्या एका उद्यमशील उद्योगी मंत्र्याच्या कारभाराने खाजगी उद्योजक आणि त्यांच्या विभागाचे प्रशासन चांगलेच वैतागले असून या मंत्र्यांना कोणी तरी आवरा …
Read More »उदय सामंत यांची घोषणा, वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी नि. न्यायाधीशामार्फत चौकशी
नुकतीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसीने अनिल अग्रवाल यांना पत्र पाठविल्याचा पुरावाच जाहिर केला. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांताच्या अधिकाऱ्यांशी देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी बैठक घेतली आणि का घेतली असा सवाल करत या बैठकीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार
बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरु होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते. या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya