Tag Archives: jayant patil

अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट...

जोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावे यासाठी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मागणी केली. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मंत्री अब्दुल सत्तार …

Read More »

जयंत पाटील यांचा पंतप्रधान मोदींना टोला, नोटबंदीचा दुखवटा अजून सरला नाही

देशात निर्माण होणाऱ्या काळा पैस्याला आळा घालण्यासाठी ११ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत देशात नोटबंदी जाहीर केली. या नोटबंदीमुळे रोजच्या आवश्यक जगण्यासाठीही नागरीकांना पैसे राहिले नाहीत. तसेच स्वत:जवळच्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना हातातील कामे बाजूला ठेवत बँकेच्या रांगेत उभा रहावे लागले. …

Read More »

आटोपशीर भाषणात शरद पवार म्हणाले, .. परिवर्तन करण्याची ताकद निर्माण झाली

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी शिर्डी येथील शिबिरास आवर्जून हजेरी लावली. त्यासाठी काही वेळासाठी शरद पवार यांनी ब्रीच कॅण्डी रूग्णालयातून सुटी घेतली. शिबीराची सांगता झाल्यानंतर शरद पवार पुन्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल झाले. भाषणाच्या सुरुवातीला शरद पवार म्हणले, मी आज फार काही बोलू शकणार नाही. …

Read More »

जयंत पाटील खोचक टोला, मग हा ईश्वरीय संकेत गुजरातला मिळाला…

काही दिवसांपूर्वी गुजरात मधील मच्छु नदीवरील झुलता पूल नव्याने उद्घाटन केल्यानंतर कोसळून १४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशा दुर्घटनांवरून राजकारण काँग्रेस करू इच्छित नाही असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. तसेच इतर राजकिय पक्षांनीही याबाबत समंज्यसपणा दाखविला. मात्र सोशल मिडीयावर पश्चिम बंगालमध्ये पूल कोसळल्यानंतर पंतप्रधान …

Read More »

देशावरील ५४ लाख कोटीचे कर्ज १४० लाख कोटींवर वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष नरेंद्र मोदी आणि भाजपा-पत्रकार अशोक वानखेडेंचा दावा

देश स्वतंत्र झाल्यानंतर २०१४ पर्यंत देशावर ५४ लाख कोटी कर्ज होते. ते एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४० लाख कोटी केले. हे सरकार केवळ आकड्यांचा जुगाड करून सत्य लपवत आहे. सध्याच्या वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष कोण असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपा पक्ष आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी जिंकलेल्या जागांचा …

Read More »

जयंत पाटील म्हणतात, राष्ट्रवादीवर जेव्हा टीका होते याचा अर्थ पक्ष बलशाली

आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो, ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टिका होत आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराला आजपासून शिर्डीत सुरुवात झाली. या शिबीराच्या …

Read More »

भाजपा म्हणते, खोटं सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू

महविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केले नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष खोटा नॅरेटीव्ह चालवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पेरत आहेत व युती सरकारची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, भाजपाने टोळीबरोबर आघाडी केलीय राष्ट्रवादी मंथन... वेध भविष्याचा' या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीचे शिर्डीत ४ - ५ नोव्हेंबरला शिबीर...

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांची दिवाळी दुःखात गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे होते, त्यांना दिलासा द्यायला हवा होता. मात्र तसे होताना दिसले नाही. सरकारमध्ये गतीमानता दिसत नाही हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत …

Read More »

जयंत पाटील यांचा डॉ भागवत कराड यांना टोला, सरकार फक्त पत्रावर चालत नाही

मराठवाड्यातील कोणत्याही प्रकल्पाला मी नकार दिलेला नाही. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी खोटे बोलणे बंद करावे. औरंगाबादकरांना इम्प्रेस करण्यासाठी भागवत कराडांचा उद्योग सुरू असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले. मराठवाड्यातील प्रकल्प मंजूर करण्यास जयंत पाटील यांनी नकार दिला असे वक्तव्य …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार?

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारला नुकतेच तीन महिने पूर्ण झाले. या तीन महिन्यात पहिल्यांदा वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटाचा नागपूर येथील एअर बस प्रकल्प गुजरातला गेला. त्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारला …

Read More »