मुंबईः प्रतिनिधी साधारणतः दोन वर्षांपूर्वी त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेल्या अनेक नेत्यांच्या वर धाडसत्र सुरु झाले होते. मात्र त्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ईडीकडून सुरु झालेला तपास कुठेपर्यत झाला याची माहिती घेवून त्या अनुषंगाने असलेली पक्षाकडे जमा झालेली माहिती देण्यासाठी लवकरच ईडीच्या अधिकाऱ्यांची वेळ घेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »भाजपाचे माजी आमदार राजू तोडसाम यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश… प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा
मुंबईः प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधासभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला. आदिवासी समाजाचा एक प्रामाणिक, होतकरु नेता राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याबाबत जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच …
Read More »चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलंय… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
रत्नागिरी: प्रतिनिधी चंद्रकांतदादा पाटील हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलं आहे, त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने गणपतीपुळे रत्नागिरी येथे असताना पत्रकारांनी चंद्रकांत …
Read More »लोकलेखा समितीसमोरील साक्ष म्हणजे जलयुक्त शिवारला क्लिनचीट नव्हे राज्य सरकारकडून खुलासा
मुंबई: प्रतिनिधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीबाबत कॅगने ताशेरे ओढले. त्या अनुषंगाने याची चौकशी करण्यासाठी एसआयटी समितीची स्थापना करण्यात आली. तसेच यासमितीकडून चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने याप्रकरणी क्लिनचीट देण्याचा प्रश्नच येत नसल्याचा खुलासा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला. काल २७ आक्टोबर, २०२१ रोजी …
Read More »एनसीबी आणि समीर वानखेडे हे एकंदरीत प्रकरण गंभीर ; योग्य ती पावले टाकणार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे संकेत
ठाणेः प्रतिनिधी प्रभाकर सैल याने समीर वानखेडे यांच्या विरोधात खळबळजनक आरोप केल्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत एनसीबी आणि समीर वानखेडे यांचे प्रकरण समोर आणले असून एकंदरीत हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत …
Read More »भाजपाच्या टोकाच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे त्याला जातीयवादाने उत्तर नाही तर धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात केले. लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जाहिर प्रवेश केला. यावेळी …
Read More »समीर खान यांच्यावर एनसीबीने केलेल्या कारवाईवर कोर्टाचे प्रश्नचिन्ह एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि टोबॅको यातला फरक कळू नये ही बाब फार गंभीर-नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी कोर्टाच्या ऑर्डरनुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे एनसीबीने समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या २७(अ) कलमातंर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला …
Read More »मावळची परिस्थिती काय आहे हे समजून घेतले तर फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल माझ्या लक्षात राहत नाही ही माझी कमतरता शरद पवारांचा खोचक टोला
मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे घडलेल्या घटनेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मावळच्या घटनेचा उल्लेख केला. बरं झालं त्यांनी उल्लेख केला. तेथील घटनेला त्यावेळचे सत्ताधारी नाहीतर पोलिस जबाबदार होते. पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा भाग म्हणून त्यांनी पोलिसांनी तशी कृती केली. त्यामुळे या घटनेबाबतचे आरोप पोलिसांवर होते. तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या …
Read More »लखीमपूर के दरिंदो को फाशी दो… फाशी दो प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष तथा मंत्री नवाब मलिकांच्य नेतृत्वाखाली आंदोलन...
मुंबई : प्रतिनिधी मोदी सरकार हाय हाय… योगी सरकारचा धिक्कार असो… भाजप सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… लखीमपूर के दरिंदो को फाशी दो… फाशी दो… किसानो के सम्मान मे राष्ट्रवादी मैदानमे… अशा जोरदार घोषणाबाजी देत राष्ट्रवादीने हुतात्मा चौक दणाणून सोडला. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि …
Read More »भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजपावर हल्लाबोल
मुंबई: प्रतिनिधी भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपवर शरसंधान साधले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र बंदला भाजपाने विरोध दर्शवित शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या गोष्टीचे अप्रत्यक्ष असमर्थन करत असल्याचा आरोप केला. आज लखीमपूर हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने …
Read More »
Marathi e-Batmya