Tag Archives: mla

अजित पवार यांची ग्वाही, ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करणारच ‘कल्याण मारहाण’ घटनेची गंभीर दखल घेत विधानसभेत

कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेत “महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, पवार साहेब, … म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये

ईव्हीएम मतदान पद्धतीवरून सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच प्रसंगी प्रशासनाबरोबर संघर्षाची तयारीही ठेवली आहे. त्यातच माळशिरसचे निर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनीही जर मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे राज्य सरकारने तयारी दर्शविली तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही यावेळी …

Read More »

या आमदारांची नावे मंत्री पदाच्या यादीत नाही? राष्ट्रवादीतील एक, शिंदे यांच्या पक्षातील दोघांची तर भाजपाच्या तिघांची

राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना आता संभावित मंत्रिमंडळाच्या यादीत कोणाचा पत्ता कट झालेला असेल याचीच चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सहभागी होणाऱ्या आमदारांच्या अंतिम यादीत आपलेही स्थान असावे यासाठी अनेक आमदारांनी सत्तेत आपलाही हिस्सा असावा यासाठी नेत्यांकडे जोरदार लॉबिंग करण्यात येत असल्याची …

Read More »

शिंदे गटाच्या आमदाराला पोलिसांनीच रोखले, आमदार झाले संतप्त विजय शिवतारे यांना पोलिसांनी रोखल्याने माजी मंत्री आणि आमदाराला ओळखत नाही का

राज्यातील सत्ता स्थापनेवरून सध्या हिवाळीच्या वाढत्या थंडीतही राजकिय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून एकमेकांच्या विरोधात नव्या सरकारचे मुख्यमंत्री आपल्यालाच कसे मिळेल यासाठी दबाव तंत्रांचा वापर करण्यात येत आहे. मात्र काळजीवाहू मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेले आमदार विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

बच्चू कडू यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका मंत्रालयातील लिपिकाला मारहाणीचे प्रकरणी न्यायालयाचा निर्णय

मंत्रालयात आरोग्य विभागातील लिपिकाला मारहाण केल्याच्या आरोप प्रकरणातून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची विशेष न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली. वैद्यकीय अधिकाऱी म्हणून नियुक्ती झालेल्या उमेदवाराकडून पैशांची मागणी केल्याप्रकरणी बच्चू कडू यांनी मंत्रालयातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयातील लिपिकाला कानशिलात लगावली होती. तसेच, त्याला हाताला धरून तत्कालीन आरोग्य मंत्री सुरेश …

Read More »

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, हत्येची जबाबदारी बिष्णोईने घेतली? कायदा आणि सुव्यवस्थेवरून महाविकास आघाडीने केली टीका

वांद्र्यांचे माजी आमदार मंत्री बाबा सिद्धीकी यांच्यावर काल अज्ञात मारेकऱ्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर बाबा सिद्धीकी यांना तातडीने लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर बाबा सिद्धीकी यांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी कूपर रूग्णालयात हलविले. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान, ठाकरेंनी विधानसभा लढून आमदार होऊन दाखवावे उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून!

देवेंद्र फडणवीस यांची जमानत जप्त करण्याची भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, आमदार होऊन नंतर आरोप करावे असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून झाला आहे, असे ते म्हणाले. चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. चंद्रशेखर …

Read More »

अखेर भरत गोगावलेंना मिळाले मंत्री पद, पण दर्जा दिलेले महामंडळाचे अध्यक्ष पद एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली निवड

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आपल्याला नक्की कॅबिनेट मंत्री पद मिळणार आणि रायगडचा पालकमंत्री मीच असणार असा दावा रायगडमधील आमदार आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे सातत्याने जाहिररित्या बोलत होते. मात्र राज्यातील सरकार जाण्याची वेळ आल्यानंतर शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा दिलेले एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद देऊ …

Read More »

राज्याची तिजोरी रिकामी ? वाळूच्या महसूल बुडविण्याला कोण देतय साथ शिंदे गटाचे आणि भाजपाच्या आमदारांच्या विरोधात महसूल विभागाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी

मागील काही वर्षात राज्य सरकारकडून जनतेला खुष करण्यासाठी सातत्याने विविध घोषणा केल्या जात आहेत. त्यातच आता तर राज्याच्या तिजोरीला मोठा खड्डा पडला असतानाही राज्यातील जनमानस पुन्हा स्वतःच्या पक्षाकडे वळविण्यासाठी दुसऱ्या राज्यातील घोषणाही आर्थिक कुवत नसताना विद्यमान सरकारकडून जाहिर केल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यातील गौणखनिज अर्थात मुरूम, वाळू, माती आदी गोष्टीतून …

Read More »

मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश

मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आज विधानसभेत आज आमदार अॅड आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी विधानसभेत …

Read More »