शिंदे गटाच्या आमदाराला पोलिसांनीच रोखले, आमदार झाले संतप्त विजय शिवतारे यांना पोलिसांनी रोखल्याने माजी मंत्री आणि आमदाराला ओळखत नाही का

राज्यातील सत्ता स्थापनेवरून सध्या हिवाळीच्या वाढत्या थंडीतही राजकिय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून एकमेकांच्या विरोधात नव्या सरकारचे मुख्यमंत्री आपल्यालाच कसे मिळेल यासाठी दबाव तंत्रांचा वापर करण्यात येत आहे. मात्र काळजीवाहू मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेले आमदार विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनीच रोखल्याने विजय शिवतारे हे चांगलेच संतप्त झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांची तब्येत बरी नसल्याने सातारा येथील दरे या गावी गेले होते. त्यानंतर नुकतेच एकनाथ शिंदे हे ठाणे येथे परतले तरी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आराम करण्याची सूचना केली. मात्र एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना शिंदे पक्षाच्या सर्व आमदारांची एक बैठक बोलावली होती. परंतु डॉक्टरांनी दिलेल्या आराम करण्याच्या सल्ल्यामुळे ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक पुन्हा रद्द केली.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या घराच्या प्रवेशद्वारावरच तैनात असलेल्या पोलिसांनी विजय शिवतारे यांची गाडी रोखली. त्यावर विजय शिवतारे हे चांगलेच संतापले. गाडी रोखणाऱ्या पोलिसांलाच थेट विजय शिवतारे यांनी म्हणाले, किती वर्षे झाले तुम्ही इथे आहात, तुम्हाला माजी मंत्री, आमदार ओळखता येत नाही का? असा सवाल केला.

त्यावर पोलिसांनी आपल्याला ओळखलं नाही म्हणून गाडी अडवल्याचे सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

यासंदर्भात विजय शिवतारे यांना याप्रकरणी विचारले असता म्हणाले की, मी छत्रपती संभाजी नगरला होतो. आज मुंबईत आल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आणि भेटण्यासाठी म्हणून मी आलो. मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत आता ठिक आहे. पण आजचा दिवस आराम करवा लागणार आहे. तसेच आज कोणत्याही बैठका आयोजित करण्यात आल्या नव्हत्या. खाते वाटपासंदर्भात सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ते जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *