बच्चू कडू यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका मंत्रालयातील लिपिकाला मारहाणीचे प्रकरणी न्यायालयाचा निर्णय

मंत्रालयात आरोग्य विभागातील लिपिकाला मारहाण केल्याच्या आरोप प्रकरणातून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची विशेष न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली.

वैद्यकीय अधिकाऱी म्हणून नियुक्ती झालेल्या उमेदवाराकडून पैशांची मागणी केल्याप्रकरणी बच्चू कडू यांनी मंत्रालयातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयातील लिपिकाला कानशिलात लगावली होती. तसेच, त्याला हाताला धरून तत्कालीन आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या स्वीय सचिवाच्या दालनात खेचत नेले होते. जानेवारी २०११ मध्ये ही घटना घडली होती. आपला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीशी काहीही संबंध नसताना बच्चू कडू यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा करून तक्रारदार लिपिकाने मरीन ड्राईव्ह पोलिसांत तक्रार दाखल करताना केला.

याप्रकरणी कडू यांच्यावर सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे, त्याला काम करण्यापासून परावृत्त करणे आदी आरोपांप्रकरणी खटला चालवण्यात आला. आमदार-खासदारांवरील खटल्यांसाठी स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. यू. कदम यानी या प्रकरणी शुक्रवारी निकाल देताना बच्चू कडू यांची त्यांच्यावरील आरोपांतून निर्दोष सुटका केली.

About Editor

Check Also

एमएमआरडीए चौकशी समितीतून जॉनी जोसेफ यांना हटवा; कोर्ट-मॉनिटर चौकशी करा पीएमसी PMC भरतीत अनियमितता आढळल्यास फेरपरीक्षा घ्या

एमएमआरडीए MMRDA च्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी गंभीर तक्रारी केल्या असून, पुणे महानगरपालिका (PMC) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *