मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात …
Read More »पंतप्रधान मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमासाठी ग्रामविकास खात्याकडून २ कोटींचा खर्च गर्दी जमवण्यासाठी ग्रामविकास खात्याचे लेखी आदेश असल्याचा धनंजय मुंडेचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी राज्य दुष्काळात होरपळत असताना, तिजोरीत खडखडाट असताना आणि राज्य कर्जबाजारी झाले असताना शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमासाठी ग्रामविकास खाते करत असलेल्या दोन कोटी रूपयांची उधळपट्टी कशाला, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केला. मोदी लाट पूर्णपणे ओसरल्याने शासकीय खर्चाने माणसे आणण्याची …
Read More »मंत्रालयात उदयनराजेंच्या भाजप मंत्र्यांशी गाठी-भेटी मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, महाजन यांच्याशी चर्चा
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मंत्री परिषदेच्या दिवशी मुंबईत मंत्रालयात येऊन भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या. उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उदयनराजे लोकसभेची जागा भाजपच्या तिकीटावर लढविणार आहेत. ते भाजपमध्ये दाखल होणार आहेत, अशा देखील …
Read More »गणेशोत्सवाच्या निमित्ताने नाराजांची भाजप नेत्यांच्या घरी गाठी-भेटी कृपाशंकर सिंह, राष्ट्रवादीचे जयदत्त क्षिरसागर भाजपच्या रांगेत
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. परंतु राजकिय क्षेत्रात यानिमित्ताने एका पक्षातील नाराजांनी सत्ताधारी पक्षातील वजनदार नेत्यांच्या घरी गाठ-भेटी घेण्याच्या मार्गाला लागले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर काँग्रेसचे नाराज नेते आणि अडगळीत पडलेले कृपाशंकर सिंह यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »अखेर अनाथ मुलांना १ टक्के आरक्षण मिळणारच शासन निर्णय प्रसिध्द
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध अनाथ आश्रमात राहणाऱ्या अनाथांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर जगण्यासाठी जातीपासूनच्या सर्व अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मुला-मुलींना शासकिय नोकऱ्यांपासून ते शासकिय लाभापर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी पात्र होता येत नव्हते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथांना १ …
Read More »अखेर मेस्मा कायद्यातून अंगणवाडी सेविकांना तूर्त दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणावाडी सेविकांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची असूनही त्यांना मेस्मा कायद्याखाली आणल्याच्या निषेधार्थ शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत आणि विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेतली. तसेच दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे शिवसेनेसह विरोधकांच्या आक्रमक भूमिकेसमोर माघार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्मा कायद्याखाली अंगणवाडी सेविकांच्या समावेशाला स्थगिती देण्याचा …
Read More »अंगणवाडी सेविकांच्या `मेस्मा’ प्रकरणावरून विधान परिषदेत गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लावण्याच्या सरकारच्या निर्णयाविरूद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ताधारी शिवसेनेने कडाडून विरोध केल्यामुळे बुधवारी विधान परिषदेचे कामकाज सुरूवातीला तीनदा तर नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले. बुधवारी सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. तेव्हा शिवसेनेचे गटनेते अॅड. अनिल परब …
Read More »मेस्मा कायदा लागू करण्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न : विधानसभेचे कामकाज बंद पाडले
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत सकाळी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच शिवसेनेचे आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला मेस्मा कायदा रद्द करण्याच्या मागणीवरून जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर सभागृहात मेस्मा कायदा रद्द करण्याबाबतचा फलकही फडकाविला. शिवसेना आमदारांमुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब …
Read More »अस्मिता योजनेसाठी वितरक म्हणून २ हजार ३७२ बचतगटांची नोंदणी दोन हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात पोहोचली अस्मिता योजना
मुंबई : प्रतिनिधी अस्मिता योजनेतून किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी वितरक म्हणून अवघ्या एका आठवड्यात २ हजार ३७२ बचतगटांनी नोंदणी केली आहे. या माध्यमातून हे बचत गट कार्यरत असलेल्या साधारण दोन हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात ही योजना पोहोचली आहे. अस्मिता फंडालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ११ हजार ४३९ मुलींच्या सॅनिटरी नॅपकीनसाठी ५१८ जणांनी स्पॉन्सरशिप स्विकारली आहे. यातून सुमारे २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपयांत तर महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणे, त्याच्या वितरण व्यवसायातून बचतगटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दुहेरी उद्देशाने जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सॅनिटरी नॅपकीनच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या मोबाईल ॲपवर नोंदणी करण्यासाठी मागील आठ दिवसात बचतगटांचा चांगला प्रतिसाद …
Read More »अनाथांना मिळणार १ टक्का आरक्षण राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिल्याची मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी समाजातील कधी भीतीपोटी किंवा मुल नको अथवा अपघाती मृत्यू झालेल्या पाल्यांना अनाथश्रमात दिवस काढावे लागतात. मात्र ही मुल शिक्षण घेवून शासकिय नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना जात राक्षसाचा सामना करावा लागतो. त्यामुळे केवळ जात लिहीता येत नसल्याने अनेकवेळा नोकरीस पात्र ठरूनही त्यांना मिळत नसल्याने अनाथांना इतर जातींप्रमाणे …
Read More »
Marathi e-Batmya