Tag Archives: rajesh tope

पॉझिटिव्हीटी दर वाढला मग लसीकरणही वाढवा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या चारही जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. …

Read More »

अखेर राज्य सरकारकडून निर्बंधात शिथिलताःजाणून घ्या कोणत्या सवलती दिल्या मात्र त्या ११ जिल्ह्यामध्ये निर्बंध कायम

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य सरकारने शेवटी नागरीकांच्या दबावापुढे नमत MissionBeginAgain अंतर्गत निर्बंधात शिथिलता देत असल्याचे जाहिर केले असून आता सर्व दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देत रविवारी मात्र संपूर्ण शहर बंद ठेण्याचे सुधारीत नियम आज राज्य सरकारकडून संध्याकाळी जारी करण्यात आले. मात्र कोरोनाची संख्या सातत्याने वाढत असलेल्या ११ …

Read More »

पुण्यात झिका आजाराचा रूग्ण काल आढळला आणि आज बराही झाला आरोग्य विभागाची माहिती

मुंबई: प्रतिनिधी पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस विषाणु …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून गेल्याने तर्क –वितर्कांना उधाण

मुंबई: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठक अर्धवट सोडून थेट ब्रीच कॅण्डीत दाखल झाले. त्यांच्या विविध तपासण्या करण्यात येत असून त्यानंतर जयंत पाटील यांना अॅडमिट करायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जयंत पाटील …

Read More »

होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही देताना राज्यात शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. मंत्रालयात होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी आमदार विक्रम काळे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.रामास्वामी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.उत्तुरे, …

Read More »

पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरून शरद पवारांचा नेमका कोणाला टोला ? पूरग्रस्तभागात ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे इतरांनी दौरे करु नयेत - शरद पवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करुन लोकांना दिलासा देण्यासाठी लक्ष घालणे योग्य ठरते. आता स्थानिक प्रशासन, तेथील संघटना आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे इतर लोकांनी पूरग्रस्त …

Read More »

कोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात जवळपास ४ आठवड्यानंतर पुन्हा ६ हजार ७५३ वर रूग्णसंख्या आली आहे. एक महिन्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र ही संख्या ६ हजाराहून खाली आलेली नाही. तसेच मुंबईतील रूग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणावर घट झाली असून ३७३ इतकी रूग्ण संख्या आज नोंदविण्यात आली आहे. …

Read More »

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अंथरूणाला खिळून असलेल्या रूग्णांचे लसीकरण कसे करायचे, त्यांना लसीकरणासाठी कसे न्यायचे असा प्रश्न अनेक कुटुंबियांना पडला होता. मात्र आरोग्य विभागानेच यावर मार्ग काढत अंथरूणावर खिळून असलेल्या रूग्णांसाठी घरपोच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून एक ई-मेल प्रसिध्द करण्यात आला असून …

Read More »

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनामुळे सर्व निर्बंध जैसे थे नियमात शिथिलता नाहीच

मुंबईः प्रतिनिधी देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला. देशाच्या तुलनेत राज्यात रुग्णवाढीचा दर कमी असला तरी करोनाचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नसून सध्या लागून असलेले निर्बंध यापुढेही कायम लागू राहतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. …

Read More »

न्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात  आला असून दरवर्षी सुमारे १९ लाख बालकांना ही लस दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी …

Read More »