महाराष्ट्रातील व्यापार व उद्योग जगताला मोठा दिलासा देत, राज्य सरकारने आयात-निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ‘ई-बॉन्ड’ प्रणाली सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरणारे हे पाऊल असून, व्यवहार सुलभ करणाऱ्या प्रक्रियेला गती देईल. असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. चंद्रशेखर …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे माहिती, शेतकऱ्यांना सावरू; मदतीसाठी लवकरच योजना • आपत्तीग्रस्तांना सरकारची सढळ मदत • उद्योजक, संस्थांनी सीएसआर फंड द्यावा
पुराने अस्मानी संकटात सोडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, कष्टाने उभारलेले संसार पुन्हा सावरण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरून परतल्यानंतर योजना नक्की केली जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीचा निर्णय घेऊ, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुंबईत पत्रकारांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्याचा जवळपास अर्धा भाग पूरग्रस्त झाला असून, पूरग्रस्त कुटुंब व …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,ओबीसींवर अन्याय होणार नाही; खोट्या नोंदी नकोच चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यास आक्षेप
ओबीसींच्या मनात आपल्यावर अन्याय होईल अशी भीती आहे. पण, तसे काही होणार नाही. कुणबी नोंदी आहेत,त्यांनाच अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळणार असून त्यासाठी प्रमाणपत्र, कुणबी नातेसंबंध, ग्रामसमिती, तहसीलदारांच्या स्तरावरील समितीचा अहवाल घ्यावा लागणार आहेत. वंशावळ जुळल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच दाखला देण्यात येईल. फक्त खोट्या नोंदी होणार नाहीत याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल, एकदा चष्मा लावून बघा, रोहित पवार म्हणाले निनावी का? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निनावी जाहिरातीवरून एकमेकांवर सोडले टीकास्त्र
राज्य सरकारमधील भाजपाच्या मित्र पक्षातील मंत्र्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोठमोठ्या जाहिराती निनावी पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले. त्यावरून रोहित पवार यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षावर टीकास्त्र सोडले. रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात खंडण्या कशा गोळा केल्या …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव सादर करा महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी साठी लागणा-या अतिरिक्त जागा मागणीचा प्रस्ताव उद्योग विभागाने महसूल विभागाकडे सादर करावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालयात प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या …
Read More »स्मार्ट सिटीचे काय ? पण मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा स्मार्ट गावांची घोषणा राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे ‘स्मार्ट’ व ‘इंटेलिजेंट’ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात आणि देशात २०१४ साली भाजपाचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी मोठा वाजत गाजत जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजनेची घोषणा करण्यात आली. तसेच स्मार्ट शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर फंडही जाहिर करण्यात आला. परंतु तेव्हापासून राज्यातील स्मार्ट सिटीचे काय झाले याचा पत्ता शासनस्तराशिवाय आतापर्यंत कोणालाच माहित झाला नाही. तसेच …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी शिफारस करणार अपघाती विमा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना शिफारस करणार
सर्पमित्र हे ग्रामीण व शहरी भागात सापांपासून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम करतात. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा कुटुंबियांना अपघाती विमासारखी आर्थिक भरपाई मिळावी यासाठी वन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली जाईल, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार, ५० लाख कुटुंबांना लाभ
राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९४७ नुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री कायद्याने प्रतिबंधित होती. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ पर्यंत शहरी भाग, गावठाण पासून २०० मीटर पर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एक गुंठेपर्यंत जमिन व्यवहारासाठी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत
नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार,४ जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपाचे आमदार गोपीचंद …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही, २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी; मोफत वाळू वितरणाचीही हमी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदन सादर
राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय अखेर घेण्यात आला असून, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदन सादर करत केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सद्यस्थितीत सकाळी ६ …
Read More »
Marathi e-Batmya